एकाचवेळी गोविंदाने साईन केले होते तब्बल ५० सिनेमे, असा बनला होता बॉलिवूडचा राजाबाबू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 08:09 AM2023-12-21T08:09:00+5:302023-12-21T08:10:01+5:30

गोविंदाने त्याच्या काळात अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Happy birthday govinda when hero no 1 gave a tough competition to all actors | एकाचवेळी गोविंदाने साईन केले होते तब्बल ५० सिनेमे, असा बनला होता बॉलिवूडचा राजाबाबू

एकाचवेळी गोविंदाने साईन केले होते तब्बल ५० सिनेमे, असा बनला होता बॉलिवूडचा राजाबाबू

आज बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदाचा वाढदिवस. २१ डिसेंबर १९६३ मध्ये त्याचा मुंबईत जन्म झाला होता. ८० आणि ९० च्या काळात गोविंदा ज्याही सिनेमाला हात लावत होता तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर होत होता. गोविंदा जबरदस्त कॉमेडीसोबतच अ‍ॅक्शन आणि डान्ससाठी ओळखला जात होता. त्या काळात त्यांचे चित्रपट धमाल करायचे. विरारचा छोरा अशी ओळख असणाऱ्या गोविंदाचे आयुष्य मुंबापुरीतच गेलंय. इतक्या वर्षांनंतरही गोविंदाचे रसिकांच्या मनातील अढळ स्थान कायम आहे. 

गोविंदाने त्याच्या काळात अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये हिरो नंबर वन, कुली नंबर वन अशा अनेक उत्तम चित्रपटांचा समावेश आहे. त्या काळात गोविंदा आणि करिश्मा कपूरची जोडी खूप गाजली होती. दोघांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 

वयाच्या 21 व्या वर्षी ज्या मुलाला कोणी ओळखत नव्हते त्याने वयाच्या 22 व्या वर्षी 50 चित्रपट साइन केले होते. गोविंदाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये 165 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक पुरस्कारही त्यांनी आपल्या नावावर केले आहेत. त्यांनी या इंडस्ट्रीला अनेक डान्स नंबर दिले आहेत. ज्यामध्ये यूपी वाला ठुमकागा, किसी डिस्को में जाये यासह अनेक गाण्यांचा समावेश आहे.

राजा बाबू, कुली नंबर 1, दीवाना मस्ताना, बडे मिया छोटे मिया, हिरो नंबर 1, साजन चले ससुराल, दुलारा, शोला और शबनम, दुल्हे राजा, हसीना मान जायेगी, हे असे काही चित्रपट आहेत जे ब्लॉकबस्टर ठरले. त्यावेळी थिएटरमध्ये लोकांची प्रचंड गर्दी असेल तर गोविंदाचा चित्रपट सुरू असल्याचे प्रेक्षक समजायचे. 

Web Title: Happy birthday govinda when hero no 1 gave a tough competition to all actors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.