‘जुम्मा... चुम्मा दे दे’ गाण्यातील ही मराठमोळी अभिनेत्री आठवतेय का ?, आता तिला ओळखंणही झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 15:38 IST2021-12-11T13:31:33+5:302021-12-11T15:38:19+5:30
‘जुम्मा... चुम्मा दे दे’ हे गीत आठवत असेल तर या थिरकणारी अभिनेत्री म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येते ती किमी काटकर (kimi katkar). किमी ही अभिनेत्री टिना काटकर यांची मुलगी.

‘जुम्मा... चुम्मा दे दे’ गाण्यातील ही मराठमोळी अभिनेत्री आठवतेय का ?, आता तिला ओळखंणही झालंय कठीण
‘जुम्मा... चुम्मा दे दे’ (chuma chuma de de) हे गीत आठवत असेल तर या थिरकणारी अभिनेत्री तुम्हाला हमखास आठवणार. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री किमी काटकर (kimi katkar) हिच्याबद्दल. ‘हम’ चित्रपटातील ‘जुम्मा... चुम्मा दे दे’ हे गाणे किमीवर चित्रीत केले गेले होते. 11 डिसेंबर 1965 रोजी जन्मलेली किमी आज 56 वर्षांच्या झाल्या आहेत.किमी काटकर (kimi katkar) ही अभिनेत्री टिना काटकर यांची मुलगी. टिना काटकर या बॉलिवूड अभिनेत्री तसेच कॉस्टयूम डिझायनर म्हणूनही ओळखल्या जात.
वयाच्या 17 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात करणा-या किमीला 1985 मध्ये पहिला ब्रेक मिळाला. ‘पत्थर दिल’ या चित्रपटात तिची वर्णी लागली. पण हा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर ‘टार्जन’ नावाचा तिचा दुसरा सिनेमा आला. या सिनेमात किमीने दिलेली बोल्ड दृश्ये आजही लोकांच्या स्मरणात आहे. या सिनेमातील हॉट सीन्समुळेच तिची बोल्ड अभिनेत्री अशी इमेज तयार झाली होती.
वर्दी, दरिया दिल, मर्द की जुबां, मेरा दिल, गैर कानूनी, शेरदिल, जुल्म की हुकुमत असे अनेक चित्रपट तिने केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘जुम्मा... चुम्मा दे दे’ या गाण्याने. या गाण्यामुळे किमीचे करिअर वेगळ्या उंचीवर गेले. पण अचानक किमीने अनेक ऑफर्स नाकारणे सुरु केले. यश चोप्रासारख्या दिग्गज दिग्दर्शकासोबतही तिने काम करण्यास नकार दिला.
याचदरम्यान तिने प्रसिद्ध फोटोग्राफर शांतनुसोबत लग्न केले. यानंतर ती चित्रपटापासून कायमची दुरावली आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. अनेक वर्षांनंतर ती भारतात परतली. सध्या ती पुण्यात आपल्या पती व मुलासोबत राहते आहे. मात्र आता किमी काटकरमध्ये प्रचंड बदल झालाय..