'आ गये मेरी मौत का...' ते 'भगवान का दिया...' पर्यंत; नाना पाटेकर यांचे दमदार डायलॉग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 04:05 PM2024-01-01T16:05:03+5:302024-01-01T16:22:00+5:30
तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले नाना यांचा क्रांतिवीर (1994) चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये मोनोलॉग खूप लोकप्रिय आहे.
बॉलिवूडमधील असे काही अभिनेते ज्यांच्या अभिनयानं आणि डायलॉग फेकण्याच्या टायमिंगनं सर्वांची मनं जिंकली. असेच एक अभिनेता म्हणजे नाना पाटेकर. आपल्या दमदार अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलीच. पण त्यांचे डायलॉग चाहत्यांच्या तोंडपाठ आहेत. आज अभिनेते नाना पाटेकर यांचा 73वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं त्यांचे दमदार फेमस डायलॉग कोणते आहेत पाहूयात.
तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले नाना यांचा क्रांतिवीर (1994) चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये मोनोलॉग खूप लोकप्रिय आहे. क्रांतीवीरचे दिग्दर्शन मेहुल कुमार यांनी केले होते. या चित्रपटात डिंपल कपाडिया, अतुल अग्निहोत्री आणि ममता कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
आ गए मेरी मौत का तमाशा देखने अब मुझे लटका देंगे, जुबान ऐसे बाहर आएगी, आंखें बहार आएंगी, थोड़ी देर लटकता रहूंगा, फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतारेगा.. फिर आप चर्चा करते घर चले जाओगे, खाना खाओगे सो जाओगे...।
अनिल मट्टो दिग्दर्शित 'यशवंत' (1997) चित्रपटात नानांनी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.
एक मच्छर, साला एक मच्छर इंसान को आदमी से हिजड़ा बना देता है। एक खटमल पूरी रात को अपाहिज कर देता है। सुबह घर से निकलो, भीड का एक हिस्सा बनो। शाम को घर जाओ, दारू पियो और बच्चे पैदा करो।
विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित 'परिंदा' (1998) या चित्रपटात नानांनी एका गँगस्टरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते.
धंधा किशन, धंधे में कोई किसी का भाई नहीं होता।
अब तक छप्पन (2004) शिमित अमीन दिग्दर्शित एक गँगस्टर क्राईम ड्रामा आहे. ज्यामध्ये नाना पाटेकर यांनी एन्काउंटर स्पेशालिस्टची भूमिका केली होती.
एक पुलिस इंस्पेक्टर ज्वाइंट कमिश्नर के साथ क्या बहस करेगा? उनको भी कोई बड़ा साहब बोला होगा, हम सब सिस्टम का हिस्सा हैं। सिस्टम डिसाइड करता है अपुन फॉलो करता है
वेलकम (2007) या कॉमेडी चित्रपटात नानांनी डॉन उदय शेट्टीची भूमिका साकारली होती.
भगवान का दिया सब कुछ है। दौलत है, शोहरत है, इज्जत है।
गुलाम-ए-मुस्तफा (1997) या पार्थो घोष दिग्दर्शित चित्रपटात नानांनी मुस्तफा नावाच्या गँगस्टरची भूमिका केली होती.
जान मत मांगना, इसकी बाजार में कोई कीमत नहीं है।