Happy Birthday Ranbir Kapoor : या कारणामुळे चारचौघात सलमान खानने मारली होती रणबीर कपूरच्या कानाखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 05:32 PM2019-09-28T17:32:02+5:302019-09-28T17:40:16+5:30
सलमान आणि रणबीरचे भांडण इतके विकोप्याला गेले होते की, सलमानने चारचौघात रणबीरच्या कानाखाली मारली होती.
रणबीर कपूरचा आज म्हणजे 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्याने आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. रणबीरने खूपच कमी वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचे एकेकाळी अफेअर होते. त्या दोघांना अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहायला मिळायचे. ते दोघे लग्न करणार असे सगळ्यांना वाटत असतानाच त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. रणबीरसोबत नात्यात असण्याच्याआधी सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा होती. कतरिनामुळेच सलमानने रणबीरच्या कानाखाली मारली होती का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण कतरिनामुळे नव्हे तर रणबीरने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सलमानने रणबीरला मारले होते.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक वर्षांपूर्वी सलमान खान त्याचा लाडका मित्र संजय दत्तसोबत एका पबमध्ये पार्टी करत होता. त्यावेळी रणबीरने बॉलिवूडमध्ये पदार्पण देखील केले नव्हते. तो देखील त्याच्या मित्रांसोबत त्याच पबमध्ये आला होता. पण तिथे सलमान आणि रणबीरची काही कारणावरून भांडणं झाली. हे भांडण इतके विकोप्याला पोहोचले होते की तेथील सगळे लोक त्यांच्या आजूबाजूला जमा झाले होते. शाब्दिक बाचाबाची सुरू असताना सलमानने अचानक रणबीरवर हात उचलला आणि त्याच्या कानाखाली मारली होती. प्रकरण हाताबाहेर जात आहे हे पाहून या प्रकरणात संजय दत्तने मध्यस्ती केली होती. त्यानंतर रणबीर पबमधून निघून गेला होता. सलमान खानचे वडील सलीम खान यांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी रणबीर आणि त्याचे वडील ऋषी कपूर यांची माफी मागितली होती.
रणबीरने असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. दहावी झाल्यानंतर त्याने आ अब लौट चले या चित्रपटासाठी त्याच्या वडिलांना असिस्ट केले होते. त्यानंतर रणबीर कपूरने परदेशात जाऊन फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले आणि संजय लीला भन्साळीला ब्लॅक या चित्रपटासाठी असिस्ट केले. याच चित्रपटाच्या दरम्यान भन्साळीने त्याला सावरिया या चित्रपटाची ऑफर दिली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपयश मिळाले असले तरी या चित्रपटातील रणबीरच्या भूमिकेचे कौतुक झाले. या चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले. त्याने त्यानंतर बचना ए हसिनो या चित्रपटात काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला. पण रणबीरला खऱ्या अर्थाने वेक अप सिड या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली.