वडिलांच्या निधनानंतर एकटा पडलेला अभिनेता, मुंबई सोडून गेला, ढाब्यावर नोकरी केली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 05:30 PM2023-10-06T17:30:44+5:302023-10-06T17:42:21+5:30

प्रत्येकाच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी वेगळी असते. बॉलिवूडमध्येही असे काही कलाकार आहेत, ज्याना संघर्ष चुकला नाहीय.

Happy birthday sanjay mishra career struggle and interesting facts | वडिलांच्या निधनानंतर एकटा पडलेला अभिनेता, मुंबई सोडून गेला, ढाब्यावर नोकरी केली अन्...

वडिलांच्या निधनानंतर एकटा पडलेला अभिनेता, मुंबई सोडून गेला, ढाब्यावर नोकरी केली अन्...

googlenewsNext

प्रत्येकाच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी वेगळी असते. बॉलिवूडमध्येही असे काही कलाकार आहेत, ज्याना संघर्ष चुकला नाहीय. या कलाकारांपैकी एक म्हणजे संजय मिश्रा. त्यांनी अभिनयाच्या जोरावर स्वत:चे स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी आपली प्रत्येक भूमिकेत जीवंत केलीय.  संजय मिश्रा आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. 

संजय मिश्रा यांचा जन्म 1963 मध्ये बिहारमधील दरभंगा येथे  झाला.  लहानपणापासूनच त्यांना अभ्यासात रस नव्हता. त्यांचे बालपण सामान्य मुलांप्रमाणेच गेले. त्यांचे वडील प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोमध्ये सरकारी कर्मचारी होते वडिलांची बनारसला बदली झाली. यामुळे त्यांनी प्राथमिक शिक्षण तेथील केंद्रीय विद्यालय बीएचयूमधून सुरू केले. यानंतर वडिलांची बदली दिल्लीला झाली त्यामुळे त्यांनी उर्वरित शिक्षण तिथून पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. दिल्लीत आल्यावर अनेकांनी त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाबद्दल सांगितले. त्यांनी तिथे प्रेवश घेतला. आज त्यांची गणना एका यशस्वी अभिनेत्याच्या यादीत होते पण इथपर्यंतचा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. 

संजय मिश्रा यांनी एकदा सांगितले होते की शूटिंगदरम्यान ते खूप आजारी पडले आणि त्यांच्या पोटातून 15 लिटर पू बाहेर काढण्यात आला. त्याची प्रकृती फारच वाईट होती. ते हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर 15 दिवसांनी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. या दुःखातून सावरणे त्यांना कठिण जात होते. वडिलांच्या निधनानंतर संजय मिश्रा एकटे पडले होते. कामातही त्यांचे मन लागत नव्हते. मुंबईत राहण्याचीही इच्छा नव्हती. अखेर त्यांनी मुंबई सोडून ऋषिकेशमध्येच काम करण्याचा निर्णय घेतलला होता. एका ढाब्यावर काम करायला सुरुवात केली होती.  मग एके दिवशी रोहित शेट्टी त्यांना शोधत आला आणि 'ऑल द बेस्ट'साठी मुंबईला येण्यासा सांगितलं. मात्र, ते तयार नव्हते पण दिग्दर्शक खूप आग्रही होता. त्यानंतर तिथून परत येऊन त्याने चित्रपटात पुन्हा कमबॅक केलं. 

Web Title: Happy birthday sanjay mishra career struggle and interesting facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.