Happy Birthday Shahrukh :जेव्हा एका जबरा फॅनने किंग खान शाहरुखकडे मागितला फोन नंबर, त्यानंतर घडले होते असे काही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 12:20 PM2018-11-02T12:20:00+5:302018-11-02T12:21:46+5:30
शाहरुखच्या अशाच एका जबरा फॅनचा किस्सा बी टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरला होता.
अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. रोमान्सचा बादशाह आणि बॉलीवुडचा किंग शाहरुख खानचे कित्येक फॅन्स आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात शाहरुखचे फॅन्स पसरलेत. त्याच्या प्रत्येक फॅन्सची काही ना काही खास बात आहे. त्यामुळेच शाहरुखच्या या फॅनवर आधारित एक सिनेमाही रुपेरी पडद्यावर झळकला. यातील जबरा फॅन हो गया हे गाणं तर बॉलीवुडच्या बाहशाहच्या प्रत्येक फॅनसाठी तंतोतंत लागू पडतं. शाहरुखच्या अशाच एका जबरा फॅनचा किस्सा बी टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरला होता.
सध्या विविध सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट आहेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. किंग खान शाहरुखचेही ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टावर अनेक फॅन्स आहेत. मात्र या सगळ्या फॅन्सपैकी एक फॅन शाहरुखचा ख-या अर्थाने जबरा फॅन ठरला. काही दिवसांपूर्वी अगदी निरागस आणि लहान असणा-या या फॅनने किंग खानकडे ट्विटरवरुन फोन नंबरची मागणी केली. आता सोशल मीडियावर कुणी फोन नंबर मागत असेल तर त्याला सेलिब्रिटी त्याला काय उत्तर देतील. मात्र शाहरुखने या चिमुकल्या आणि जबरा फॅनला दिलेले उत्तर वाचुन तुम्हालाही हसू आवरणार नाही. 'हा नक्की पाठवतो माझा नंबर आणि माझं आधार कार्डही पाठवू का ?' अशा शब्दांत शाहरुखने आपल्या जबरा फॅनला उत्तर दिलं.
किंग खानच्या उत्तराने हा जबरा फॅन भलताच खुश झाला. त्यानं शाहरुखच्या ट्विटला रिप्लाय दिला आणि म्हटलं की, मला नंबरही नको आहे आणि आधार कार्डसुद्धा नको आहे. मला तर फक्त तुझ्याकडून एक जादू की झप्पी हवी आहे. हा रिप्लाय पाहून शाहरुखनेही उत्तर दिलं की का नाही लगेच पाठवतो. शाहरुखच्या या उत्तराने त्याच्या या जबरा फॅनचं मन नक्कीच जिंकलं असेल.