बाप सुपरस्टार तर लेक सुपर फ्लॉप, ५ वर्षात ४ सिनेमे; आथिया शेट्टीचा बॉलिवूडला रामराम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 13:42 IST2023-11-05T13:39:24+5:302023-11-05T13:42:24+5:30
अथिया शेट्टी ही बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. वडील सुपरस्टार असताना देखील अथिया ही फ्लॉप ठरली.

बाप सुपरस्टार तर लेक सुपर फ्लॉप, ५ वर्षात ४ सिनेमे; आथिया शेट्टीचा बॉलिवूडला रामराम?
बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची एन्ट्री सोपी आहे, पण इथे टिकून राहणे खूप कठीण. असे अनेक स्टार किड्स आहेत ज्यांचे करिअर सुरू झाल्यानंतर लगेचच संपले. वडील सुपरस्टार असले तर मुलाचं फिल्मी करिअर मात्र म्हणावं तसं चाललं नाही. त्यापैकीच एक स्टार किड अथिया शेट्टी. अथिया शेट्टी ही बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. वडील सुपरस्टार असताना देखील अथिया ही फ्लॉप ठरली. बॉलिवूडमध्ये पाच वर्षांच्या करिअरमध्ये ती एकही हिट सिनेमा देऊ शकली नाही.
अथिया शेट्टी आज आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म ५ नोव्हेंबर १९९२ रोजी मुंबईत झाला. लहानपणापासून तिला अभिनयाची आवड होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अथियाने अभिनयात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. तिने २०१५ मध्ये 'हिरो' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या सिनेमात ती सूरज पांचोळीसोबत झळकली होती. पण अथियाचा हा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.
त्यानंतर ती अनिल कपूर आणि अर्जुन कपूरच्या 'मुबारकां' सिनेमात दिसली. जो २०१७ मध्ये रिलीज झाला होता. हा देखील फ्लॉप ठरला. त्यानंतर अथिया २०१८ मध्ये 'नवाबजादे' मध्ये पाहायला मिळाली. पण, हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कामगिरी करु शकला नाही. तर २०१९ मध्ये 'मोतीचूर चकनाचूर' सिनेमा प्रदर्शित झाला. 'मोतीचूर चकनाचूर' हा तिचा शेवटचा चित्रपट होता. यामध्ये ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली होती. या फ्लॉपनंतर त्याने कोणताही चित्रपट केला नाही.
फिल्मी जगतात पाऊल ती फारशी यश मिळवू शकली नाही. पण प्रेमात मात्र ती जिंकली. अथियाने भारताचा स्टार क्रिकेटर के.एल राहुलशी २३ जानेवारी २०२३ रोजी कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये लग्न केलं. काही वर्ष एकमेंकाना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. या दोघांचे लग्न सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर झाले होते. लग्नानंतर अथिया शेट्टी आणि केएल हे नेहमीच कपल गोल्स देताना दिसतात.