Happy Bitrthday Jugal Hansraj : हा चॉकलेटी हिरो सध्या करतो हे काम!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 09:24 AM2018-07-26T09:24:28+5:302018-07-26T09:25:46+5:30
बॉलिवूडीमध्ये असे अनेक आहेत, ज्यांनी शानदार एन्ट्री केली पण प्रेक्षकांनी त्यांना स्वीकारले नाही. असाच एक अभिनेता म्हणजे, जुगल हंसराज.
बॉलिवूडीमध्ये असे अनेक आहेत, ज्यांनी शानदार एन्ट्री केली पण प्रेक्षकांनी त्यांना स्वीकारले नाही. असाच एक अभिनेता म्हणजे, जुगल हंसराज. ‘घर से निकल ते ही...’ हे गाणे आठवले की, चॉकलेटी हिरो जुगल हंसराज हटकून आठवतो. आज(२६जुलै) जुगल हंसराजचा वाढदिवस. तेव्हा जाणून घेऊ या, त्याच्याबद्दलच्या काही माहित नसलेल्या गोष्टी...
१९८३ मध्ये जुगलने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली ती बालकलाकार म्हणून. होय, ‘मासूम’ या चित्रपटात तो बालकलाकार म्हणून दिसला. यानंतर १९८६ मध्ये आलेल्या ‘कर्मा’ आणि ‘सुहागरात’ या चित्रपटातही त्याने बालकलाकार साकारला. १९९६ मध्ये ‘पापा कहते है’ या चित्रपटातून जुगलने बॉलिवूड डेब्यू केला. पण लोकांच्या नजरेत येण्यासाठी त्याला सन २००० ची प्रतीक्षा करावी लागली. सन २००० मध्ये जुगल ‘मोहब्बतें’मध्ये दिसला. मल्टीस्टारर असला तरी हा जुगलचा पहिला हिट सिनेमा होता.
२००२ मध्ये ‘प्यार तुम्ही से कर बैठे’मध्ये तो दिसला. पण हा चित्रपट फ्लॉप राहिला. यानंतर जुगलने एक मोठा ब्रेक घेतला. २०१० मध्ये ‘प्यार इंम्पॉसिबल’मधून त्याने कमबॅक केले. पण हा चित्रपटही दणकून आपटला. यानंतर जुगल इंडस्ट्रीत अधूनमधून दिसला. माधुरीसोबत ‘आजा नचले’ आणि याचवर्षी आलेल्या ‘कहानी2’मध्ये जुगल खलनायकाच्या भूमिकेत दिसला. पण यात त्याची भूमिका अतिशय लहान होती.
फार कमी लोकांना माहित असले की,‘कभी खुशी कभी गम’च्या शीर्षक गीताच्या ८ ओळी जुगलने लिहिल्या होत्या. केवळ लिहिल्याच नव्हत्या तर त्या कंपोजही केल्या होत्या.
२०१४ मध्ये जुगलने त्याची एनआरआय गर्लफ्रेन्ड जास्मीनसोबत लग्न केले. हे लग्न अतिशय गुपचूप झाले. जुगलच्या एका मित्राने सोशल मीडियावर जुगलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. तेव्हा कुठे त्याच्या लग्नाची बातमी उघड झाली होती. जॅस्मीन न्यूयॉर्कमध्ये इव्हेस्टमेंट बँकर आहे.
करण जोहर जुगल हंसराचा लहानपणीचा मित्र आहे. चित्रपटांत जम बसत नाही, हे लक्षात आल्यावर जुगलने त्यातून बाहेर पडणे योग्य समजले. सध्या तो करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये काम करतो.