रॅपर हार्ड कौरचा मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ, ट्विटरने केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 10:57 AM2019-08-14T10:57:46+5:302019-08-14T10:59:27+5:30

प्रसिद्ध रॅपर हार्ड कौर सध्या एका वादामुळे चर्चेत आली आहे. हार्ड कौरने एक व्हिडीओ शेअर केला होता.

hard kaur twitter account suspend after she gave abusive remark to pm modi and amit shah | रॅपर हार्ड कौरचा मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ, ट्विटरने केली कारवाई

रॅपर हार्ड कौरचा मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ, ट्विटरने केली कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्दे  एक ग्लासी, पैसा फेंक, पार्टी अभी बाकी है ही हार्ड कौरची गाणी तुफान गाजलीत. हार्ड कौरचे खरे नाव तरण कौर ढिल्लन आहे.

प्रसिद्ध रॅपर हार्ड कौर सध्या एका वादामुळे चर्चेत आली आहे. या वादानंतर तिचे ट्विटर अकाउंट संस्पेंड करण्यात आले आहे. हार्ड कौरने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी अपशब्दांचा वापर करण्यात आला होता. यात ती खलिस्तानी समर्थकांसोबत दिसली होती. हे सर्वजण खलिस्तान चळवळीवर बोलत होते.
2 मिनिटे 20 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये हार्ड कौरने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले होते. हार्ड कौरने तिच्या  ट्विटरवर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आणि काही क्षणात तो ट्रेंड होऊ लागला. यानंतर हार्ड कौरने तिच्या आगामी गाण्याची प्रमोशन क्लिप तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली. या क्लिपमध्येही ती पुन्हा त्याच खलिस्तानी समर्थकांसोबत दिसली. तिच्या या वादग्रस्त व्हिडीओ व क्लिपमुळे ट्विटरने तिचे अकाऊंट ‘सस्पेंड’ केले.


काही शीख समुह दीर्घ काळापासून एका वेगळ्या देशाची म्हणजेच स्वतंत्र खलिस्तानची मागणी करत आहेत. याआधी जून महिन्यातही हार्ड कौरने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर गंभीर आरोप करत, आक्षेपार्ह कमेंट्स केल्या होत्या. यानंतर तिच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता.  आयपीसी कलम 124 अ, 153अ, 500, 505 आणि 66 आयटी कायद्यानुसार तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


  एक ग्लासी, पैसा फेंक, पार्टी अभी बाकी है ही हार्ड कौरची गाणी तुफान गाजलीत. हार्ड कौरचे खरे नाव तरण कौर ढिल्लन आहे. हार्ड कौरने ‘जॉनी गद्दार’ सिनेमात ‘मूव युवर बॉडी’, ‘बचना ए हसीनों’मध्ये ‘लकी बॉय’ ही गाणी गायली आहेत. 2011 साली रिलीज झालेल्या ‘पटियाला हाऊस’ या सिनेमातही ती दिसली होती. या सिनेमात अभिनेत्री अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होती. या सिनेमाला बॉक्स आॅफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला आणि अक्षय कुमारच्या बॉलिवूड करिअरमधील यशस्वी सिनेमांच्या यादीत हा सिनेमा सामील झाला होता.

Web Title: hard kaur twitter account suspend after she gave abusive remark to pm modi and amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.