भूमिका जिवंत वाटण्यासाठी स्टार्सना करावे लागले ‘हे’ काम !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 03:24 PM2020-02-21T15:24:40+5:302020-02-21T15:42:03+5:30
चित्रपटाला प्रेक्षकांच्या मनात आणि मेंदूत बसविण्यासाठी कलाकार जेव्हा आपली ओळख विसरुन त्या भूमिकेत पूर्णत: सामावून घेतात तेव्हा ती भूमिका जिवंत वाटल्याशिवाय राहत नाही. आज आपण अशाच काही स्टार्सबाबत जाणून घेऊया जे आपल्या भूमिकेसाठी स्वत:च्याच अस्तित्वाला विसरुन गेले होते.
-रवींद्र मोरे
चित्रपटातील भूमिका जिवंत वाटण्यासाठी स्टार्सना अथक प्रयत्न करावे लागतात. अनेकदा भूमिका साकारताना स्टार्स त्या भूमिकेत एवढे शिरतात की, स्वत:चेचे अस्तित्व विसरतात. आणि अशी भूमिका प्रेक्षकांच्या मनात घरही करुन जाते. चित्रपटाला प्रेक्षकांच्या मनात आणि मेंदूत बसविण्यासाठी कलाकार जेव्हा आपली ओळख विसरुन त्या भूमिकेत पूर्णत: सामावून घेतात तेव्हा ती भूमिका जिवंत वाटल्याशिवाय राहत नाही. आज आपण अशाच काही स्टार्सबाबत जाणून घेऊया जे आपल्या भूमिकेसाठी स्वत:च्याच अस्तित्वाला विसरुन गेले होते.
* रणवीर सिंग
रणवीर सिंगने आपल्या दमदार अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीत तीनही खानला एकट्याने टक्कर दिली आहे. आपल्या नऊ वर्षाच्या चित्रपट करिअरमध्ये त्याने ‘गोलियों की रासलीला-रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ यासारखे चित्रपट देऊन इंडस्ट्रीत कायमस्वरुपीचे पाय रोवले. पद्मावतमधील साकारलेल्या अलाऊद्दीन खिलजीच्या भूमिकेद्वारे त्याने दाखवून दिले की, तो बॉलिवूडमधून एवढ्या सहजतेने मागे हटणार नाही. विशेष म्हणजे या चित्रपटातील अभिनयापासून ते गाण्यापर्यंत त्याने एवढी मेहनत घेतली होती की त्याच्या कंबरेच्या समस्या निर्माण झाल्या होत्या.
* नवाजुद्दीन सिद्दीकी
एक काळ असाही होता की, बॉलिवूडमध्ये मदन पुरी, लॉयन, रंजीत, राज बब्बर आणि अमरीश पुरी सारखे दिग्गज अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत दिसत होते. आज मात्र त्यांच्या भूमिकेला नवाजुद्दीन एकटाच आवाहन देताना दिसत आहे. अगदी लहान-लहान भूमिकेतही नवाजुद्दीनने आज मोठ्या खलनायकांमध्ये स्वत: सिद्ध केले आहे. विशेषत: चित्रपटांना त्याच्या रुपाने एक सायको व्हिलनसारखा अॅक्टरही मिळाला. ‘रमन राघव’ चित्रपटात त्याने साकारलेली सायको व्हिलनची भूमिका हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.
* वरुण धवन
वरुण धवन हल्ली आपल्या अभिनयात गंभीरतेला जागा नाही देत आहे, मात्र त्याने ‘बदलापुर’ चित्रपटाद्वारे सिद्ध करुन दाखविले की, जर एखाद्या निर्मात्याने त्याला घेऊन एखाद्या गंभीर विषयावर चित्रपट बनविला तर तो त्याचे पैसे नक्की वसूल करुन देईल. २०१५ मधील ‘बदलापुर’मध्ये वरुणने आपल्या चॉकलेटी लुक अॅक्टर इमेजपासून बाहेर निघून गंभीर भूमिकेसाठी जीवतोड मेहनत केली होती.
* अनुष्का शर्मा
अनुष्का शर्मा आज यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजपर्यंत तिने साकारलेल्या भूमिकांपैकी 'एनएच 10' या चित्रपटात गंभीर भूमिका साकारून सर्वांनाच चकित केले होते. २०१५ मध्ये आलेल्या या चित्रपटात भूमिकेबरोबरच अनुष्का निर्माती म्हणूनही जुडली होती. या चित्रपटात अनुष्काने छेडछाडीच्या सीनमध्ये एका अबला स्त्रीची भूमिका अगदी हुबेहूब साकारली होती. या सीनमध्ये लाथ, पंच आणि ठोसा स्क्रिप्टमध्ये समावेश होते. यावर अनुष्काने म्हटले होते की, पुरुष असे कसे वागू शकतात.