Natasha Stankovic : का तुटलं हार्दिक-नताशाचं नातं; कोणी केली कुणाची फसवणूक ? धक्कादायक स्क्रिनशॉट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 05:22 PM2024-08-14T17:22:27+5:302024-08-14T17:22:57+5:30
नताशा स्टँकोव्हिचने सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
क्रिकेटर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) घटस्फोट दिल्यानंतर मॉडेल नताशा स्टँकोव्हिच (Natasha Stankovic) ही मुलाला घेईन तिच्या मायदेशी म्हणजेच सर्बियाला निघून गेली. ज्या दिवशी हार्दिक आणि नताशाने सोशल मीडियावर घटस्फोटाची बातमी जाहीर केली, त्याच्या आदल्याच दिवशी नताशा भारत सोडून गेली. पण, दोघांनी वेगवेगळे होण्याचा निर्णय का घेतला, यावर चाहते तर्कवितर्क लावत आहे. यातच आता नताशाने असे काही केले आहे, ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर हार्दिकने तुझी फसवणूक केली का? असा प्रश्नही चाहते नताशाला विचारताना दिसून येत आहेत.
वैवाहिक आयुष्यातली फसवणूक, मानसिक त्रास यासंदर्भातील एक रील नताशने लाईक केल्याचं दिसून आलं आहे. याचे काही स्क्रीनशॉटही व्हायरल होत आहे. हे पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. जेव्हा हार्दिक नताशा आणि हार्दिकने घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हा अनेकांनी नताशाला दोष दिला. तिला गोल्ड डिगरही म्हटलं होतं. पण आता नताशानं लाइक केलेली पोस्ट पाहून तिची नात्यात फसवणूक तर झाली नाही ना? अशा चर्चा सुरू आहे.
दरम्यान, हार्दिक आणि नताशाने सोशल मीडिया पोस्ट करत घटस्फोट जाहीर केला होता. लग्नानंतर ४ वर्षांनी हार्दिक आणि नताशा वेगळे झाले. बरेच प्रयत्न करुनही ते नातं टिकवू शकले नाहीत. आयपीएलपासूनच दोघांमध्ये बिनसल्याचं समोर आलं होतं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही नताशान हार्दिकसाठी एकही पोस्ट केली नव्हती. यानंतर तिने आयुष्यासंदर्भात अनेक क्रिप्टिक पोस्ट शेअर केल्या होत्या. आता घटस्फोटानंतर नताशा तिच्या मुलासोबत सर्बियामध्येच राहतेय.