हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट घेताच नताशाने सोडला भारत, लेकाला घेऊन कुठे गेली?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 08:37 AM2024-07-19T08:37:13+5:302024-07-19T08:38:21+5:30
Hardik Pandya Divorce : हार्दिक आणि नताशाने घटस्फोट घेतला आहे. हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नताशाने लेक अगस्त्यबरोबर भारत देश सोडला आहे.
Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce: गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविच यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर गुरुवारी(१८ जुलै) हार्दिक आणि नताशाने घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हार्दिक-नताशाने घटस्फोटाची बातमी चाहत्यांना दिली. हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नताशाने लेक अगस्त्यबरोबर भारत देश सोडला आहे.
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच नताशाला एअरपोर्टवर अगस्त्यसोबत स्पॉट करण्यात आलं होतं. तिचा एअरपोर्टवरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण, अगस्त्यला घेऊन नताशा नेमकी कुठे चालली आहे? याबाबत तिने काहीच माहिती दिली नव्हती. हार्दिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर नताशा मायदेशी परतली आहे. नताशा अगस्त्यला घेऊन सर्बियाला गेली आहे. मायदेशी परतल्यानंतर नताशाने तिथले घरातील फोटो शेअर केले आहेत. "होम स्वीट होम" असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
घटस्फोटानंतर हार्दिक आणि नताशा दोघेही मिळून लेक अगस्त्यचा सांभाळ करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि हे नाते वाचवण्यासाठी सर्व काही दिले. पण आता आम्हा दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटते. आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण, परस्परांचा आदर आणि एकमेकांचा सहवास घेत आम्ही एक कुटुंब म्हणून वाटचाल केली. मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात अगस्त्य आहे, जो नेहमी आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असेल. आम्ही दोघे मिळून त्याची काळजी घेऊ. त्याला जगातील सर्व सुख मिळावे यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू आणि त्याच्या आनंदासाठी जे काही करता येईल ते करू. आम्हाला आशा आहे की तुमचा पाठिंबा मिळेल आणि या कठीण काळात आमची गोपनीयता तुम्ही समजून घ्याल", असं हार्दिक आणि नताशाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नताशा आणि हार्दिकने २०२०मध्ये लग्न करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नानंतर काहीच महिन्यांनी नताशाने त्यांच्या पहिल्या मुलाला अगस्त्यला जन्म दिला. गेल्याच वर्षी नताशा आणि हार्दिकने पुन्हा मोठ्या धामधुमीत लग्नगाठ बांधली होती. ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केलं होतं. पण, अखेर आता ४ वर्षांनी त्यांचा संसार मोडला आहे.