हार्दिक पांड्याच्या वाढदिवशीच पूर्वपत्नी नताशाची एल्विश यादवसोबत 'ती' पोस्ट, नेटकरी म्हणतात-

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 11:59 AM2024-10-12T11:59:36+5:302024-10-12T11:59:55+5:30

हार्दिक पांड्याची पूर्वपत्नी नताशाने एल्विश यादवसोबत खास पोस्ट केल्याने लोकांच्या चर्चांना उधाण आलंय (hardik pandya, natasha stankovic, elvish yadav)

Hardik Pandya ex wife natasa stankovic share reel video with elvish yadav viral | हार्दिक पांड्याच्या वाढदिवशीच पूर्वपत्नी नताशाची एल्विश यादवसोबत 'ती' पोस्ट, नेटकरी म्हणतात-

हार्दिक पांड्याच्या वाढदिवशीच पूर्वपत्नी नताशाची एल्विश यादवसोबत 'ती' पोस्ट, नेटकरी म्हणतात-

हार्दिक पांड्या हा भारताचा क्रिकेटपटू. काही महिन्यांपूर्वी वैयक्तिक आयुष्यातील प्रसंगांमुळे हार्दिक चांगलाच चर्चेत आला. २०२४ मध्ये ४ वर्षांनंतर हार्दिकने त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यानंतर नताशा आणि हार्दिक जाहीरपणे त्यांच्या पुर्वायुष्याबद्दल कधीच बोलले नाहीत. काल हार्दिकचा वाढदिवस झाला. या  वाढदिवशीच हार्दिकची पूर्वपत्नी नताशाने एल्विश यादवसोबतचा रील पोस्ट केल्याने नेटकऱ्यांच्या चर्चांना उधाण आले.

नताशा आणि एल्विशची ती पोस्ट

काल अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या नताशा स्टेनकोविक आणि एल्विश यादव या दोघांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन सर्वांनाच चकित करुन सोडले. झालं असं की, नताशाने एल्विशसोबत एक खास रील पोस्ट केलंय. या व्हिडीओत एल्विश-नताशा समुद्रकिनारी भटकंती करताना पाहायला मिळत आहेत. 'तेरे करके' हे गाणं बॅकग्राऊंडला वाजत असून या दोघांचा हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. "GUYS, सरप्राइज कसं वाटलं?" असं एल्विशने या व्हिडीओखाली लिहिलंय. 


नेटकऱ्यांच्या तुफान कमेंट्स

हार्दिक पांड्याच्या वाढदिवशीच हा रील व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी या रीलखाली भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. "एकदम अविश्वसनीय", "क्या बात है भाई", "भाई वाढदिवशी असं करायला नाही पाहिजे होतं", अशा खास कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. हा रील व्हायरल झालाच शिवाय नताशा आणि एल्विशला एकत्र डिनर करतानाही बघितलं गेलं. आता या दोघांमध्ये काय शिजतंय? दोघं एकत्र कोणत्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

 

Web Title: Hardik Pandya ex wife natasa stankovic share reel video with elvish yadav viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.