Hardik -Natasha Divorce : हार्दिक पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटानंतर मुलगा अगस्त्यची कस्टडी कोणाला मिळणार? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 13:00 IST2024-07-19T12:59:44+5:302024-07-19T13:00:29+5:30
नताशा किंवा हार्दिक दोघांपैकी कुणाला अगत्स्यची कस्टडी मिळेल, यावर सध्या चर्चा सुरू आहे

Hardik -Natasha Divorce : हार्दिक पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटानंतर मुलगा अगस्त्यची कस्टडी कोणाला मिळणार? जाणून घ्या...
भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू आणि नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात ज्याने महत्त्वाची भूमिका बजावली त्या हार्दिक पंड्याने पत्नी नताशापासून विभक्त होत असल्याचे जाहीर केलं आहे. हार्दिक आणि नताशाने आता लग्नाच्या चार वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत त्यांचा मुलगा अगत्स्य कोणासोबत राहणार, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे.
नताशा किंवा हार्दिक दोघांपैकी कुणाला अगत्स्यची कस्टडी मिळेल, यावर सध्या चर्चा सुरू आहे. हार्दिक आणि नताशाने त्यांच्या तीन वर्षांच्या अगस्त्यच्या पालकत्वाबाबतही भाष्य केले. वेगळे होत असलो तरी अगस्त्यचे पालकत्व दोघांकडेही राहणार आहे. नताशा सध्या मुलासोबत तिच्या पालकांच्या घरी आहे.
नताशा आणि हार्दिक यांची पहिली भेट २०१८ मध्ये एका नाईट क्लबमध्ये झाली होती. तेव्हा हार्दिक पहिल्याच नजरेत नताशाच्या प्रेमात पडला होता. यानंतर नताशा हार्दिकच्या वाढदिवसासाठी हजर होती आणि तेथूनच त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या. हार्दिक आणि नताशाने ३१ मे २०२० ला लग्नगाठ बांधली होती. तसेच फेब्रुवारी २०२३ मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन विधींनुसार पुन्हा एकदा लग्न केले होते. मात्र त्यांनतर वर्षभरातच पंड्या कुटुंबात काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
यंदाच्या आयपीएल २०२४ मध्ये हार्दिकला भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागत. मात्र त्यावेळेस सुद्धा नताशाने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. इतकेच नव्हे तर त्यादरम्यान तिने आपल्या इन्स्टाग्रामच्या नावातून पंड्या हे आडनाव सुद्धा काढून टाकले होते. काही दिवसांनी नताशाने लग्नाचे फोटो इन्स्टा अकाउंटवरून डिलीट केले होते. हार्दिकने सुद्धा मुंबईत परतल्यावर केवळ आपला मुलगा अगस्त्यसह सेलिब्रेशन करून फोटो शेअर केले होते पण त्यातही नताशा दिसली नव्हती. अखेर गुरूवारी रात्री हार्दिक -नताशाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कायदेशीररित्या वेगळं होतं असल्याची घोषणा केली.