'लोकांना वाटलं माझा मृत्यु झाला.पण..'; 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 04:30 PM2021-12-23T16:30:00+5:302021-12-23T16:30:00+5:30

Harish Patel: गेल्या काही वर्षांत त्यांचा बॉलिवूडचा वावर कमी झाल्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अनेक गैरसमज, अफवा पसरल्या होत्या.

harish patel says people assumed i have died just because i was not working in india eternals film | 'लोकांना वाटलं माझा मृत्यु झाला.पण..'; 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली खंत

'लोकांना वाटलं माझा मृत्यु झाला.पण..'; 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली खंत

googlenewsNext

'अॅव्हेंजर्स' आणि 'आयरन मॅन' यांसारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या मार्वल स्टुडिओचा इटर्नल हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हॉलिवूडमध्ये गाजत असलेल्या या चित्रपटाची भारतीय प्रेक्षकांमध्येही क्रेझ असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलिवूडमधील एक दिग्गज अभिनेतादेखील झळकला आहे.  उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे हरीश पटेल (Harish Patel) या हॉलिवूडपटात झळकले आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत त्यांचा बॉलिवूडचा वावर कमी झाल्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अनेक गैरसमज, अफवा पसरल्या होत्या. इतकंच नाही तर, चक्क त्यांचं निधन झालं अशीही चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली होती.

हरीश पटेल हे नाव बॉलिवूडमध्ये कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुंडा या चित्रपटात त्यांनी हिबू हटेला ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे त्यांची ही भूमिका तुफान गाजली होती. या चित्रपटानंतर ते मंडी, गुंडा, मिस्टर इंडिया, अंदाज़ अपना अपना आणि जुबैदा यांसारख्या असंख्य चित्रपटांमध्ये झळकले. तसंच काही मालिकांमध्येही काम केलं. सध्या हरीश यांचा बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडमधील वावर वाढला आहे. त्यामुळेच एकाएकी बॉलिवूडमधून गायब झालेल्या या अभिनेत्याचं निधन झालं की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता.

"काही वर्षांपूर्वीच मी देश सोडून युकेमध्ये शिफ्ट झालो आहे. त्यामुळेच हिंदी चित्रपट वा मालिकांमधील माझा वावर कमी झाला. यात माझा वावर कमी झाल्यामुळे माझं निधन झालं असा समजही अनेकांचा झाला होता. पण मला एक प्रश्न सतत पडतो, मी जिवंत आहे की मेलोय हे लोकांनी मला विचारण्याचा प्रयत्न का केला नाही? फक्त कुठे दिसून येत नव्हतो म्हणून माझं निधन झालंय असा समज करुन घेतला", असं हरीश म्हणाले.

दरम्यान, हरीश सध्या हॉलिवूडपटांमध्ये त्यांचं नाव कमावत आहेत. त्यांनी रन फॅटबॉय रन, कोरोनेशन स्ट्रीट, द बुद्धा ऑफ सबर्बिया या काही प्रोजेक्टमध्ये ते झळकले आहेत.
 

Web Title: harish patel says people assumed i have died just because i was not working in india eternals film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.