अपारशक्ती खुराना 'ह्या' सिनेमासाठी पुन्हा एकदा बनणार हरियाणवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 16:00 IST2018-10-26T13:33:58+5:302018-10-26T16:00:00+5:30
अपारशक्ती खुराना पुन्हा एकदा हरियाणवी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.

अपारशक्ती खुराना 'ह्या' सिनेमासाठी पुन्हा एकदा बनणार हरियाणवी
अभिनेता आमीर खान अभिनीत 'दंगल' चित्रपटातून अभिनेता अपारशक्ती खुराना घराघरात पोहचला. या सिनेमात तो हरियाणवी मुलाच्या भूमिकेत दिसला होता. ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. त्याची खूप प्रशंसा झाली होती. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा हरियाणवी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. तो 'राजमा चावल' या चित्रपटात हरियाणवी बोलताना दिसणार आहे.
अपारशक्ती खुराना एखादी भूमिका मनापासून करतो. तसेच तो भूमिकेसाठी जीतोड मेहनतदेखील घेतो. त्याच्या मते, भूमिकेत मग्न झाले पाहिजे. भूमिका साकारताना त्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही पाहिजे. अपारशक्तीने दंगल चित्रपटाच्या वेळी हरियाणवी भाषा शिकला असून त्याचे लहेजादेखील आत्मसात केला आहे. दंगलच्यावेळी घेतलेले हे प्रशिक्षण आता त्याला आगामी चित्रपट 'राजमा चावल'च्या वेळी उपयोगी येणार आहे. या चित्रपटातील भूमिका त्याला सहजरित्या साकारता येणार आहे. भलेही या सिनेमाच तो हरियाणवी असला तरी ही भूमिका 'दंगल' चित्रपटापेक्षा खूप वेगळी आहे.
याबाबत अपारशक्ती सांगतो की,' एक कलाकार म्हणून मी मानतो की प्रत्येक भूमिका वेगळ्या प्रकारे निभावली पाहिजे. तसेच दुसरी भाषा शिकणे व त्यांची संस्कृती स्वीकारणे खूपच इंटरेस्टिंग असते. मला अशा भूमिका साकारायला खूप मजा येते. त्यातून एक वेगळाच आनंद मिळतो.'
अपारशक्ती खुरानाला 'राजमा चावल'मधून पुन्हा एकदा हरियाणवी भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे.