​‘हार्पर बाजार 150 फॅशनेबल वूमेन्स’ : प्रियांका चोप्राचा यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2017 04:04 PM2017-01-29T16:04:55+5:302017-01-29T23:32:57+5:30

प्रियांका चोप्राने आपल्या फॅशन सेंसने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच, हार्पर बाजारने प्रसिद्ध केलेल्या १५० फॅशनेबल महिलांच्या यादीत प्रियांका चोप्राचा समावेश केला आहे.

'Harper Bazar 150 Fashionable Womens': Priyanka Chopra's list included | ​‘हार्पर बाजार 150 फॅशनेबल वूमेन्स’ : प्रियांका चोप्राचा यादीत समावेश

​‘हार्पर बाजार 150 फॅशनेबल वूमेन्स’ : प्रियांका चोप्राचा यादीत समावेश

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा यशाच्या शिखरावर आहे असेच म्हणावे लागेल. क्वांटिको २मध्ये ती अभिनय करीत आहे सोबतच तिचा आगामी हॉलिवूड चित्रपट बेवॉच लवकर प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे अमेरिकेत तिने आपल्या फॅशन सेंसने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच, हार्पर बाजारने प्रसिद्ध केलेल्या १५० फॅशनेबल महिलांच्या यादीत प्रियांका चोप्राचा समावेश केला आहे. 

प्रियांचा चोप्रा हॉलिवूडमधील आपल्या असाईनमेंट पूर्ण करून बॉलिवूडमध्ये सक्रिय होण्याच्या वाटेवर असतानाच तिच्या नावाचा डंका अमेरिकेत वाजू लागला आहे. नुकताच पार पडलेल्या आॅस्कर अवॉर्ड सेरोमनीत तिने घातलेला गाऊन गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला आहे. ग्लोडन ग्लोब अवॉर्डमध्येही तिने परिधान केलेल्या ड्रेसची चर्चा होती. अशातच हार्पर बाजारने जाहीर केलेली यादीतून तिच्या फॅशन सेंसवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. हार्पर बाजारने आतापर्यंतच्या १५० फॅशनेबल महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ‘द न्यू गार्ड’ कॅटेगरीमध्ये प्रियांका चोप्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रियांकाने हार्पर बाजारसाठी फोटोशूट केले होते. Read More : समर पोस्टर्समध्येही प्रियंका चोपडाच्या को-स्टार्सनीच लावला बोल्डनेस तडका



या यादीत ब्री लार्सन, डकोटा जॉनसन, एमिलिया क्लार्क, मार्गोट रॉबी आणि गल गेडॉट यांच्या नावाचाही समावेश आहे. ही यादी जाहीर झाल्यावर आनंदी असलेल्या प्रियांकाने ट्विट करून हार्पर बाझारचे आभार मानले आहे. प्रियांकाने लिहले, ‘‘धन्यवाद हार्पर बाझार माझी निवड १५० फॅशनेबल महिलांच्या आणि असाधारण गटातील यादी समाविष्ट करण्यासाठी...’’ Read More :  प्रियांका चोप्रा म्हणते,‘भारतीय हीच माझी ओळख’

 


प्रियांका चोप्राचा आगामी हॉलिवूड चित्रपट बेवॉच २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे, या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला असून यात निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रियांका हॉट अवतारात दिसते आहे. बेवॉच हा चित्रपट प्रियांकाचा हॉलिवूडमधील डेब्यू ठरणार आहे. या चित्रपटात ती ड्वेन जॉनसन ऊ र्फ रॉक याच्यासोबत दिसेल. या चित्रपटात ती व्हिक्टोरीयाची भूमिका साकारत आहे. 
 

Web Title: 'Harper Bazar 150 Fashionable Womens': Priyanka Chopra's list included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.