Raghav Chadha Parineeti Chopra : “मी आधीच..” परिणीती चोप्रा व राघव चड्ढांचं अखेर ठरलं, प्रसिद्ध गायक हार्डी संधूने केलं कन्फर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 11:16 AM2023-03-31T11:16:31+5:302023-03-31T11:18:50+5:30

Raghav Chadha Parineeti Chopra Relationship: सध्या बॉलिवूडमध्ये कशाची चर्चा सुरू आहे, तर परिणीती चोप्राची. होय, परिणीती आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांना डेट करत असल्याची चर्चा जोरात आहे. दोघं लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे...

harrdy sandhu confirms parineeti chopra and raghav chadha marriage | Raghav Chadha Parineeti Chopra : “मी आधीच..” परिणीती चोप्रा व राघव चड्ढांचं अखेर ठरलं, प्रसिद्ध गायक हार्डी संधूने केलं कन्फर्म

Raghav Chadha Parineeti Chopra : “मी आधीच..” परिणीती चोप्रा व राघव चड्ढांचं अखेर ठरलं, प्रसिद्ध गायक हार्डी संधूने केलं कन्फर्म

googlenewsNext

Raghav Chadha Parineeti Chopra Relationship: सध्या बॉलिवूडमध्ये कशाची चर्चा सुरू आहे, तर परिणीती चोप्राची. होय, परिणीती आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांना डेट करत असल्याची चर्चा जोरात आहे. आता तर दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. लवकरच दोघांचा रोका होणार असल्याचा दावाही केला जात आहे. परिणीती व राघव चड्ढा मात्र अद्याप तरी यावर काहीही बोलायला तयार नाहीत. पण अनेकांनी या नात्यावर शिक्कामोर्तब मात्र केलंय.  काही दिवसांआधीच आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करत परिणीत व राघव चड्ढा दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर आता प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता हार्डी संधूनेही (Harrdy Sandhu) दोघांना शुभेच्छा देत, दोघांचं नातं कन्फर्म केलं आहे.

डीएनएला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हार्डीने परिणीत लग्न करणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे. अखेर परिणीती आपल्या आयुष्यात सेटल होतेय... हे घडतंय, याचा मला प्रचंड आनंद आहे. मी तिला शुभेच्छा देतो, असं हार्डी संधू म्हणाला.

पुढे त्याने सांगितलं की, मी व परिणीती ‘कोड नेम: तिरंगा’चं शूटींग करत होतो, तेव्हा आमच्यात तिच्या लग्नाबद्दल बोलणं झालं होतं. मला योग्य व्यक्ती मिळाल्यावरच मी लग्न करणार, असं ती मला म्हणाली होती. मी परिणीतीशी बोललो आहे आणि तिला फोनवरून शुभेच्छाही दिल्या आहेत.
याआधी आम आदमी पार्टीचे नेते संजीव अरोरा यांनी परिणीती व राघव चड्ढा यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मी राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे मनापासून अभिनंदन करतो. मला आशा आहे की, दोघांचा सहवास प्रेम आणि आनंदाने भरलेला असेल. माझ्या शुभेच्छा, असं ट्विट त्यांनी केलं होतं.

राघव आणि परिणिती या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे आणि त्यांचे अनेक कॉमन फ्रेन्ड्स आहेत. परिणीती चोप्रा नुकतीच राघव चड्ढांसोबत मुंबईत स्पॉट झाली होती. दोघेही एकत्र डिनर डेट एन्जॉय करताना दिसले होते. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. मात्र, परिणीती आणि राघव यांनी अद्याप या वृत्तांवर अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही. राघव यांना परिणीतीबद्दल विचारलं असता, राजनीति के बारे में पूछो परिणीति के बारे में नहीं, असं ते म्हणाले होते.
लग्नाच्या अफवांदरम्यान अभिनेत्री परिणीती आणि राघव बुधवारी रात्री दिल्ली विमानतळावर एकत्र दिसले. यावेळी पत्रकारांना टाळून परिणीती घाईघाईने कारमध्ये शिरताना दिसली. तिने काळ्या रंगाचे कपडे घातले होते. 

Web Title: harrdy sandhu confirms parineeti chopra and raghav chadha marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.