CoronaVirus : ‘हॅरी पॉटर’च्या लेखिकेने सांगितला उपाय, ट्विंकल खन्नाने शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 03:08 PM2020-04-07T15:08:42+5:302020-04-07T15:09:41+5:30
काय आहे व्हिडीओ
कोरोना व्हायरसमुळे अख्ख्या जगाला धडकी भरली आहे. सामान्य जनताच नाही तर सेलिब्रिटींनाही या व्हायरसने विळखा घातलेला आहे. अलीकडे ‘हॅरी पॉटर’ची लेखिका जे के रोलिंग हिच्याही कोरोनाची लक्षणे आढळलीत. पण दोन आठवड्यांच्या आयसोलेशननंतर ती एकदम ठणठणीत झाली. कशी तर एका विशिष्ट व्यायामाने. खुद्द रोलिंगने सोशल मीडियावर ही माहिती दिली. दोन आठवड्यानंतर मी पूर्णपणे बरी झाली आहे, असे तिने सोशल मीडियावर लिहिले आहे. सोबत एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. एका विशिष्ट व्यायामामुळे बरी झाल्याचा दावा रोलिंगने या व्हिडीओत केला आहे. जे के रोलिंगचा हा व्हिडीओ अभिनेत्री ट्विंकल खन्नाने शेअर केला आहे.
काय आहे व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहा़ एका डॉक्टरने या विशिष्ट व्यायामाबद्दल सल्ला दिला आहे. दोन आठवड्यांपासून माझ्यात कोरोनाची लक्षणे दिसत होती. मी हा व्यायाम केला आणि माझ्यातील लक्षणे दूर झालीत. हे करायला एकही पैसा लागत नाही. पण हे तंत्र तुमच्या प्रिय व्यक्तिंचा फायद्याचे ठरू शकते,’ असे रोलिंगने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे. हाच व्हिडीओ ट्विंकलने रिपोस्ट केला आहे.
कोण आहे जे के रोलिंग
जे के रोलिंग ही एक ब्रिटिश लेखिका आहे. तिची हॅरी पॉटर या काल्पनिक व्यक्तिरेखेशी निगडित कादंब-यांची मालिका इंग्लिश साहित्यक्षेत्रात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. इ.स. १९९० साली मँचेस्टर ते लंडन या रेल्वेप्रवासात तिला या मालिकेची कल्पना सुचल्याचे म्हटले जाते. हॅरी पॉटर पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्या जवळपास ४० कोटी प्रती जगभरात विकल्या गेल्या आहेत, तसेच त्यावर आधारित चित्रपटदेखील लोकप्रिय ठरले आहेत.
हॅरी पॉटर पुस्तकांच्या तडाखेबंद खपामुळे अवघ्या पाच वर्षांत ती लखपती बनली. मार्च इ.स. २०१० सालातल्या फोर्बसच्या कोट्यधीशांच्या यादीत जे.के. रोलिंगला स्थान देताना त्यांनी तिची संपत्ती १ अब्ज अमेरिकन डॉलरांइतकी असल्याचे नमूद केले आहे़