हर्षवर्धन कपूरचे सेटवर ‘नखरे’ सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2016 10:46 AM2016-10-23T10:46:43+5:302016-10-23T10:47:23+5:30
स्टारपुत्र म्हटल्यावर एक प्रकारचा ‘अॅटिट्यूड’ असणारच. त्यामुळे अनिल कपूरचा लाडका मुलगा हर्षवर्धन तरी कसा अपवाद ठरेल. ‘मिर्झिया’ बॉक्स आॅफिसवर ...
स टारपुत्र म्हटल्यावर एक प्रकारचा ‘अॅटिट्यूड’ असणारच. त्यामुळे अनिल कपूरचा लाडका मुलगा हर्षवर्धन तरी कसा अपवाद ठरेल. ‘मिर्झिया’ बॉक्स आॅफिसवर सपाटून आपटल्यावरही या ‘स्टार’चे नखरे वाढले आहेत. याचा त्रास मात्र ‘भावेश जोशी’ सिनेमाचे निर्माते आणि क्रू सदस्यांना होत आहे.
विक्रमादित्य मोटवानेचा बऱ्याच कालखंडापासून रखडलेल्या ‘भावेश जोशी’ची शूटींग आता कुठे तरी सुरूळीत चालू झाली आहे. ‘मिर्झिया’च्या प्रोमोशनमधून फ्री झाल्यामुळे हर्षवर्धनने चित्रपटावर काम करणे सुरू केले. पण सेटवर तो करत असलेल्या ‘डिमांड्स’मुळे संपूर्ण युनिट हैराण झाले आहे.
सुत्रांनुसार, या स्टारपुत्राच्या सतत केल्या जाणाऱ्या मागण्या पूर्ण करता करता निर्माते आणि सर्व टीम त्रस्त झाली आहे. सेटवरील त्याचे नखरे ‘खान त्रिकुटा’सारखे स्टेटस असलेल्या सेलिब्रेटींनाही लाजवतील असे आहेत, अशी खमंग चर्चा इंडस्ट्रीमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण शूटींग कशी होणार याच चिंतेत दिग्दर्शक आहे.
एवढेच नाही तर, त्याच्या मागण्या आणि तक्रारींना कंटाळून निर्मात्याने हर्षवर्धनला स्वत:चाच मेक-अप आर्टिस्ट आणि हेअर स्टाईलिस्ट आणण्यास सांगितले. आता अनिल कपूरचा मुलगा म्हणून त्याने लगेच स्वत:ची टीम आणली. एखाद्या हीरोईनपेक्षा जास्त वेळ तो हेअरस्टाईल आणि मेकअपमध्ये घालवतो.
‘मिर्झिया’च्या अपयशाने तो कामाकडे जरा गांभीर्याने बघेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याचे असे ‘बडे बाप की औलाद’सारखे वागणे पाहून निर्मात्यांनी तर धास्तीच घेतली आहे. प्रेक्षकांनी साफ झिडकारून दिल्यावर समीक्षकांनीही त्याच्या अभिनय कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
पापा अनिल आता मुलाला समजावून सांगतात की त्याचे समर्थन करतात हे बघणे रंजक ठरेल. निदान त्यांनी तरी त्याला समज द्यावी. अन्यथा असे कित्येक स्टारपुत्र आहेत जे कधी आले अन् कधी गेले, हे कोणालाच कळालेदेखील नाही.