१६ व्या वर्षीच सोडलं घर, विवाहित अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चा; कोण आहे ४१ वर्षीय अभिनेता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:18 IST2024-12-18T16:16:04+5:302024-12-18T16:18:08+5:30
२-३ सिनेमेच हिट देऊनही हा अभिनेता चाहत्यांचा अत्यंत लाडका आहे.

१६ व्या वर्षीच सोडलं घर, विवाहित अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चा; कोण आहे ४१ वर्षीय अभिनेता?
मनोरंजनविश्वात काही मोजक्या सिनेमांमधूनच काही कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. मात्र अशा कलाकारांना संधी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो याची आपल्याला कल्पनाही नसते. असाच एक अभिनेता आहे ज्याने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या १६ व्या वर्षीच घर सोडलं. आज त्याची खूप जास्त लोकप्रियता आहे. कोण आहे तो?
आई तेलुगू आणि वडील मराठी अशा कुटुंबात जन्म झालेला हा अभिनेता आहे हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane). १६ व्या वर्षीच घर सोडून तो मुंबईत आला.२००८ साली त्याने 'लेफ्ट राइट लेफ्ट' मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये छोटी भूमिका साकारली होती. २०१० मध्ये त्याने तेलुगू सिनेोमात प्रवेश केला. तर २०१६ साली आलेल्या 'सनम तेरी कसम'या हिंदी सिनेमामुळे त्याने चाहत्यांच्या मनात कायमचं घर केलं. हा सिनेमा आजही तरुणाईचा सर्वात आवडता आहे.
हर्षवर्धन राणेला संजय लीला भन्साळींच्या 'रामलीला' सिनेमाची ऑफर मिळाली होती. पण त्याने ती नाकारली. कारण त्याला खलनायकाची भूमिका साकारायची नव्हती. मात्र नंतर त्याला या निर्णयाचा पश्चात्ताप झाला. भन्साळींच्या सिनेमात काम करणं करिअरसाठी फायदेशीर होतं हे त्याला नंतर पटलं. हर्षवर्धनने 'हसीन दिलरुबा', 'तारा व्हर्सेस बिलाल' हे सिनेमे केले.
विवाहित अभिनेत्रीसोबत डेटिंग
हर्षवर्धन वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आला होता.'मोहोब्बते' फेम अभिनेत्री किम शर्मासोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा होत्या. मात्र त्यांचा ब्रेकअप झाला. नंतर अभिनेत्री संजीदा शेखसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. तेव्हा संजीदा विवाहित होती. या नात्यामुळे हर्षवर्धनच्या आयुष्यात खूप बदल झाले. दोघांनी कधीच हे नातं स्वीकारलं नाही.