अनुष्का शर्मा सध्या काय करते, दोन वर्षापासून आहे सिनेसृष्टीपासून दूर, तर या गोष्टीत असते बिझी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 17:07 IST2020-03-02T17:06:12+5:302020-03-02T17:07:45+5:30
विराटसह व्हॅकेशनवर तर कधी बॉलिवूडच्या पार्ट्या, अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावताना दिसते. तिचा शेवटचा सिनेमा होता 'परि'. यानंतर तिचे दर्शन रूपेरीव पडद्यावर घडलेच नाही.

अनुष्का शर्मा सध्या काय करते, दोन वर्षापासून आहे सिनेसृष्टीपासून दूर, तर या गोष्टीत असते बिझी
चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांचं आयुष्य ऐशोआरामाचं असतं. त्यांची जीवनशैली फारच उच्च असते असं आपण पाहतो. त्यातच एखादा चित्रपट सुपरहिट झाला, त्या चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव झाला की त्या चित्रपटातील कलाकाराचं आयुष्यच पालटतं हेही आपण वारंवार पाहिलंय.त्याहूनही उलट ती अभिनेत्री असली आणि तिने लग्न केले असले तर काम मिळण्याची संधी तशा कमीच होतात हे आजही बॉलिवूडमध्ये चित्र पाहायला मिळते.
अनुष्का शर्मा गेल्या दोन वर्षापासून रूपेरी पडद्यावर झळकलीच नाही. याचे कारणही तसे खासच आहे.
लग्नानंतर तिची करिअरची गाडी सध्या स्लो ट्रॅकवर आली असल्याचे चित्र आहे. एकही सिनेमाच्या ऑफर्स सध्या तिच्याकडे नाहीत. त्यामुळे ती कधी विराटसह व्हॅकेशनवर तर कधी बॉलिवूडच्या पार्ट्या, अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावताना दिसते. तिचा शेवटचा सिनेमा होता 'परि'. यानंतर तिचे दर्शन रूपेरीव पडद्यावर घडलेच नाही.
अनुष्का शर्माने गेल्या वर्षी सुमारे 28.67 कोटी रुपये कमावले असल्याची माहिती समोर आली होती. मात्र 2020 मध्ये अनुष्काने कमाईचा आकडा तर सोडाच चांगली ऑफरही मिळेनाशी झाली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली तर पत्नी अनुष्का शर्माबरोबर भटकंती करत असल्याचे वारंवार समोर येते.