WHAT? प्रभासनं सलमान, अक्षयलाही मागे टाकलं! ‘आदिपुरूष’साठी इतकं मानधन घेतलं!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 05:21 PM2021-11-24T17:21:28+5:302021-11-25T10:09:10+5:30

Adipurush , Prabhas : आदिपुरूष बॉलिवूडचे लीडिंग प्रोड्यूसर भूषण कुमार प्रोड्यूस करत आहेत. साहजिकच भूषण कुमार यांच्यासारखा तगडा निर्माता सिनेमा प्रोड्यूस करणार म्हटल्यावर मानधनाची रक्कमही तगडी असणार.

Has Prabhas Charged Rs 150 Crore For Adipurush | WHAT? प्रभासनं सलमान, अक्षयलाही मागे टाकलं! ‘आदिपुरूष’साठी इतकं मानधन घेतलं!!

WHAT? प्रभासनं सलमान, अक्षयलाही मागे टाकलं! ‘आदिपुरूष’साठी इतकं मानधन घेतलं!!

googlenewsNext

‘बाहुबली’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर साऊथ सुपरस्टार प्रभास  (Prabhas) जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. आता काय तर प्रभासनं भाईजान सलमान खान, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांनाही मागं टाकलं आहे. होय, प्रभासच्या झोळीत अनेक सिनेमे आहेत आणि राधेश्याम व आदिपुरूष (Adipurush)  या दोन चित्रपटाची सर्वाधिक चर्चा आहे. आदिपुरूष बॉलिवूडचे लीडिंग प्रोड्यूसर भूषण कुमार प्रोड्यूस करत आहेत. साहजिकच भूषण कुमार यांच्यासारखा तगडा निर्माता सिनेमा प्रोड्यूस करणार म्हटल्यावर मानधनाची रक्कमही तगडी असणार. होय, चर्चा खरी मानाल आदिपुरूष साईन केल्यानंतर प्रभास भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे.

बॉलिवूड हंगामानं दिलेल्या वृत्तानुसार, आदिपुरूष  आणि संदीप रेड्डी यांच्या ‘स्पिरिट’साठी थोडं थोडंक नव्हे तर तब्बल 150 कोटींपेक्षा अधिक मानधन घेतलं आहे. याचसोबत प्रभास देशातील सर्वाधिक महागडा अभिनेता बनला आहे. गेल्या 10 वर्षांत 100 कोटी चार्ज करणारा प्रभास हा तिसरा अभिनेता बनला आहे. याआधी सलमाननं सुल्तान व टायगर जिंदा है या सिनेमांसाठी 100 कोटींच्या घरात मानधन घेतलं होतं. त्यापाठोपाठ अक्षय कुमारचा नंबर लागतो. बेलबॉटमसाठी म्हणे त्याने 100 कोटींची फी मागितली होती.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरूष या चित्रपटात प्रभाससोबत सैफ अली खान, क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत आहे. रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभास प्रभु श्रीरामाची भूमिका साकारणार आहे तर सैफ रावणाच्या भूमिकेत आहे. 
 आदिपुरुष हा चित्रपट 3 डी अ‍ॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा आहे. भूषण कुमार यांनी याची निर्मिती केली आहे. 11 ऑगस्ट 2022 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती सध्या दिली जात आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Has Prabhas Charged Rs 150 Crore For Adipurush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Prabhasप्रभास