Vijay Deverakondaने Rashmika Mandannaसोबत बांधली लग्नगाठ? जाणून घ्या व्हायरल फोटो मागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 12:19 PM2022-11-22T12:19:44+5:302022-11-22T12:24:32+5:30
Vijay Devarakonda And Rashmika Mandanna Viral Photo: सोशल मीडियावर दोघांचा हा फोटो सध्या जोरदार व्हायरल होतोय.
Vijay Devarakonda And Rashmika Mandanna Viral Photo: रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा(Vijay Devarakonda) हे पॅन इंडियाचे स्टार आहेत. साऊथच्या चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंतही या दोन स्टार्सची चर्चा आहे. या स्टार्सनी नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. साऊथच्या चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंतही या दोन स्टार्सची चर्चा आहे. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडते. मग ती ऑनस्क्रिन असो वा ऑफस्क्रिन. दोघांच्या अफेरच्या बातम्याही मीडियात सतत चर्चेत असतात. मात्र रश्मिका आणि विजय देवरकोंडा आपण एकमेकांचं चांगले मित्र असल्याचं सांगतात. सध्या दोघांचा फॅन्सनी एडिट केलेला एक फोटो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय.
चाहत्याने केली कमेंट
या फोटोत रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा वधू-वरांच्या ड्रेसमध्ये एकत्र दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या कपलनं खरंच लग्न केलं की काय?, असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.
या एडिट फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'हा एडिट केलेला फोटो एक दिवस खरा ठरेल.'
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी 'गीता गोविंदम', 'चलो' आणि 'डियर कॉम्रेड'मध्ये एकत्र काम केले आहे. दोघांना अनेकदा डिनर आऊटिंगवर एकत्र स्पॉट झाले आहेत. याशिवाय नुकतेच दोघेही एकत्र व्हॅकेशनवर गेल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
अलीकडेच 'लायगर' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, विजय आणि अनन्या पांडे करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये दिसले होते. या शोदरम्यान अनन्याने विजय रश्मिताला डेट करत असल्याची हिंट दिली होती, पण विजय देवरकोंडाने रश्मिकाला या शोमध्ये आपली चांगली मैत्रीण असल्याचे सांगितलं होतं.