शाळेच्या गणवेशात दोन वेण्यांमध्ये दिसणार 'या' क्यूट मुलीला ओळखलंत का?, साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आहे तिचा डंका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 10:46 AM2023-02-11T10:46:27+5:302023-02-11T10:51:00+5:30

बॉलिवूड सेलिब्रिटींचा मोठा चाहता वर्ग आहे. जो त्यांचं बालपणीचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतो.

Have you seen actress Taapsee Pannu childhood-photo in school dress | शाळेच्या गणवेशात दोन वेण्यांमध्ये दिसणार 'या' क्यूट मुलीला ओळखलंत का?, साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आहे तिचा डंका

शाळेच्या गणवेशात दोन वेण्यांमध्ये दिसणार 'या' क्यूट मुलीला ओळखलंत का?, साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आहे तिचा डंका

googlenewsNext

Bollywood And South Popular Actress Childhood Photo:  गेलेली वेळ कधीच परत येत नाही, फक्त आठवणीच राहतात! पण काही खास क्षण  आपण कॅमेऱ्यात टिपतो. मग जेव्हा जेव्हा ते फोटे समोर येतात तेव्हा तो काळही डोळ्या पुढे उभा राहतो. बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे काही न पाहिलेले फोटो ( Actress Childhood Pics)  सोशल मीडियावर अनेकवेळा व्हायरल होत असतात. याच क्रमात पुन्हा एकदा एका बॉलिवूड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो (Bollywood Actress Childhood Photo)  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 या फोटोत ती शाळेच्या गणवेशात दिसत आहे आणि दोन वेण्यांमध्ये ती खूपच गोंडस दिसत आहे. पण ती कोण आहे हे ओळखणे अनेकांना कठीण जात आहे. फोटोमध्ये आपल्या क्यूटनेसने सर्वांची मनं जिंकणारी ही मुलगी दुसरी कोणी नसून साऊथ  (South) आणि बॉलिवूड अभिनेत्री  (Bollywood Actress) तापसी पन्नू (Taapsee Pannu)आहे. या फोटोत दिसत आहे की तापसी पन्नू शाळेत झालेल्या स्पोर्ट्समध्ये पहिली आली आहे. फोटोमध्ये थोडेसे स्मितहास्य करून, ती तिच्या बक्षीससह उभी आहे. 

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर, तापसी पन्नू शेवटची ब्लर सिनेमात दिसली होती.  तापसी पन्नूची गणना अशा बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये केली जाते ज्या सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असतात. तापसी पन्नूची प्रत्येक पोस्ट चाहत्यांना खूप आवडते आणि ती लगेच व्हायरल होते.


 

Web Title: Have you seen actress Taapsee Pannu childhood-photo in school dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.