अक्षय कुमारच्या छोट्या बहिणीला पाहिलंत का? ३ मुलांच्या वडिलांसोबत थाटलाय दुसरा संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 09:17 IST2025-04-16T09:17:01+5:302025-04-16T09:17:34+5:30
Akshay Kumar Sister Alka Bhatia : अक्षय कुमार नेहमीच प्रसिद्धीझोतात राहतो, तर त्याची बहीण अलका भाटिया लाइमलाइटपासून दूर राहते. अक्षय कुमारची बहीण चित्रपट निर्माती देखील आहे.

अक्षय कुमारच्या छोट्या बहिणीला पाहिलंत का? ३ मुलांच्या वडिलांसोबत थाटलाय दुसरा संसार
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत कार्यरत आहे. तो दरवर्षी ४-५ चित्रपट करण्यासाठी प्रसिद्ध आहे पण त्याचे शेवटचे काही चित्रपट रुपेरी पडद्यावर कमाल दाखवू शकले नाहीत. पण, एक काळ असा होता जेव्हा त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत होते. अक्षय कुमार, त्याची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. अक्षयची भाची सिमर देखील लवकरच तिच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. पण, तुम्हाला सुपरस्टारच्या बहिणीबद्दल माहिती आहे का? अक्षय कुमार नेहमीच प्रसिद्धीझोतात राहतो, तर त्याची बहीण अलका भाटिया (Alka Bhatia) लाइमलाइटपासून दूर राहते. अक्षय कुमारची बहीण चित्रपट निर्माती देखील आहे.
१९७० मध्ये जन्मलेल्या अलका भाटियाने दिल्लीत शालेय शिक्षण आणि मुंबईत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. एकेकाळी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती खूप चर्चेत होती. २०१२ मध्ये तिच्या लग्नामुळे ती खूप चर्चेत आली होती. खरंतर, हे अलकाचे दुसरे लग्न होते आणि तिचा नवरा तिच्यापेक्षा वयाने १५ वर्षांनी मोठा होता. वयातील फरक लक्षात घेता, अक्षय आणि त्याचे कुटुंब अलकाच्या दुसऱ्या लग्नाच्या विरोधात होते. पण नंतर त्यांनी आनंदाने लग्न लावून दिले.
अलकाने १९९७ मध्ये केले पहिले लग्न
अलकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, अलकाने १९९७ मध्ये वैभव कपूरशी लग्न केले. लग्नानंतर तिने तिची मुलगी सिमर भाटियाला जन्म दिला. पण, त्यांचे लग्न जास्त काळ टिकले नाही. अलका आणि वैभवमध्ये वाद होऊ लागले, ज्यामुळे दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर, तिने तिची मुलगी सिमरचे संगोपन एकटीने केले. त्यानंतर अलकाच्या आयुष्यात उद्योगपती सुरेंद्र हिरानंदानी यांचा प्रवेश झाला.
अलका तिच्या दुसऱ्या लग्नामुळे आली चर्चेत
२०१२ मध्ये, अलका सुरेंद्र हिरानंदानी यांच्यासोबतच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत होती. जेव्हा अलकाने सुरेंद्र हिरानंदानी यांच्याशी लग्न केले तेव्हा तिची मुलगी सिमर १४ वर्षांची होती. तर तिचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. जेव्हा अलकाने सुरेंद्र यांच्याशी लग्न केले तेव्हा ती ४० वर्षांची होती आणि सुरेंद्र ५५ वर्षांचे होते. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. सुरेंद्र यांचे पहिले लग्न प्रीती हिरानंदानीशी झाले होते, ज्यांच्याशी त्यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी घटस्फोट घेतला. या लग्नापासून त्यांना तीन मुले आहेत. दुसऱ्या लग्नानंतर, अलका तीन मुलांची सावत्र आई बनली.
अक्षय कुमारचे जीजू आहेत अब्जाधीश
सुरेंद्र हिरानंदानी यांचा फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. सुरेंद्र हे हाऊस ऑफ हिरानंदानी ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक होते. त्यानंतर त्यांनी त्यांचा भाऊ निरंजन यांच्यासोबत १९८५ मध्ये पवई मुंबईत २५० एकर जमीन खरेदी केली आणि हिरानंदानी गार्डन्सच्या नावाने रिअल इस्टेट व्यवसाय सुरू केला. २०१८ मध्ये फोर्ब्सने त्यांची एकूण संपत्ती १.३ अब्ज अमेरिकन डॉलर्स (११३०६ कोटी रुपये) असल्याचा अंदाज वर्तवला होता.