चंदन रॉय सान्यालची 'धन्नो' पाहिलीत का?, धन्नोला पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 06:30 AM2019-06-05T06:30:00+5:302019-06-05T06:30:00+5:30
धन्नो म्हटले की आठवते ती 'शोले' चित्रपटातील हेमा मालिनी यांची स्वारी म्हणजेच घोडा गाडी. आणखीन एक धन्नो समोर आली आहे.
धन्नो म्हटले की आठवते ती 'शोले' चित्रपटातील हेमा मालिनी यांची स्वारी म्हणजेच घोडा गाडी. आणखीन एक धन्नो समोर आली आहे ती म्हणजे हासूची ऑटो रिक्षा. अभिनेता चंदन रॉय सान्याल लवकरच साय-फाय वेब सीरिज 'हवा बदले हासू'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजमध्ये त्याने हासू नामक रिक्षा चालकाची भूमिका साकारली आहे.
हासूचे पर्यावरणावर खूप प्रेम असते आणि त्याला पर्यावरणाची खूप काळजी वाटत असते. वायू प्रदुषणामुळे तो खूप चिंतेत असतो. त्याला पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची धडपड असते. त्यामुळे तो नेहमी आपल्या ग्राहकांसोबत जीवनाबद्दल बोलताना वायू प्रदुषणाबद्दल सांगत असतो. एक दिवस बदल होईल यावर ठाम विश्वास असलेला हासू रिक्षेत सीएनजीचा वापर करून पर्यावरणासाठी छोटेसे आपले योगदान देतो. इतकेच नाही तर त्याची रिक्षा इको फ्रेंडली केली आहे. अशाप्रकारची रिक्षा तुम्ही यापूर्वी कधी पाहिलेली नाही. हासूची इको फ्रेंडली रिक्षामध्ये एअर क्वॉलिटी मीटर, ऑक्सिजन स्प्रे, ग्रीन टेरेस आणि रिक्षाच्या आत मनीप्लांटचे झाडही आहे.
याबद्दल चंदन रॉय सान्याल सांगतो की, हासूची रिक्षा ही जगावेगळी असून अशी रिक्षा कुठे पहायला मिळणार नाही. या रिक्षात छोटी छोटी रोपं, ऑक्सिजन सिलेंडर व अशा बऱ्याच पर्यावरणजनक गोष्टी आहेत. हासूने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उचलले हे पाऊल फक्त हासूसारख्या रिक्षावाल्यांसाठी तर सर्व सगळ्या रिक्षा चालकांसाठी एक आदर्श आहे. रिक्षाचालक हा सर्वात मोठा वायू प्रदुषणाचा बळी आहे.
दररोज बारा-बारा तास रिक्षा चालवतात, त्यामुळे त्यांनी किमान प्रदुषण (सीएनजी) करणारे वाहन चालवले पाहिजे. हासू हा बदल घडवून आणणारा व्यक्ती आहे. ज्याला सर्वात जास्त त्रास होतो तोच तो बदल घडवून आणू शकतो ".