'शोले'तील गब्बरच्या मुलाला पाहिलंत का?, तो देखील आहे अभिनेता पण ८ सिनेमांनंतर बॉलिवूडला केलं रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 10:37 IST2025-03-14T10:36:34+5:302025-03-14T10:37:06+5:30

Amjad Khan Son : अमजद खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील त्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते, जे आपल्या अप्रतिम अभिनयाने क्षणार्धात प्रेक्षकांची मने जिंकत असत. त्यांचा मुलगा शादाब खान याने अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली. पण त्याला वडिलांप्रमाणे यश मिळू शकले नाही.

Have you seen Gabbar's son from 'Sholay'? He is also an actor but left Bollywood after 8 films. | 'शोले'तील गब्बरच्या मुलाला पाहिलंत का?, तो देखील आहे अभिनेता पण ८ सिनेमांनंतर बॉलिवूडला केलं रामराम

'शोले'तील गब्बरच्या मुलाला पाहिलंत का?, तो देखील आहे अभिनेता पण ८ सिनेमांनंतर बॉलिवूडला केलं रामराम

अमजद खान (Amjad Khan) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील त्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते, जे आपल्या अप्रतिम अभिनयाने क्षणार्धात प्रेक्षकांची मने जिंकत असत. पात्र सकारात्मक असो वा नकारात्मक, अमजद यांनी ते अतिशय सहजतेने साकारले. एक यशस्वी अभिनेता म्हणून त्यांचा वारसा खूप मोठा होता, जो पुढे नेण्यासाठी त्यांचा मुलगा शादाब खान (Shadab Khan) याने अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली. पण त्याला वडिलांप्रमाणे यश मिळू शकले नाही. ८ चित्रपटांनंतर शादाब खानने बॉलिवूडमधून संन्यास घेतला.

शोले चित्रपटातील अमजद खान आजही गब्बर सिंग या नावाने ओळखले जातात. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मोठा मुलगा शादाब खानने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १९९७ मध्ये आलेल्या बेताबी चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र त्याला राणी मुखर्जी स्टारर चित्रपट राजा की आयेगी बारात मधून अभिनेता म्हणून सर्वाधिक ओळख मिळाली. पण एक यशस्वी अभिनेता म्हणून शादाब खानच्या कारकिर्दीत फारसे काही घडले नाही आणि केवळ ८ चित्रपटांनंतर त्याने अभिनयाला रामराम केला.

बेताबी, राजा की आएगी बारात, हे राम, रिफ्यूजी, भारत भाग्य विधाता, हाइवे 203, रोमियो अकबर वॉल्टर (R.A.W) या चित्रपटात शादाब खानने काम केलंय. मात्र तरीही तो मध्ये मध्ये चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसतो. तो शेवटचा दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या २०२० मध्ये प्रदर्शित झालेली वेबसीरिज स्कॅम 1992 या वेब सीरिजमध्ये दिसला होता. 

आता शादाब दिसतो असा
काळासोबत शादाब खानचा लूकही पूर्णपणे बदलला आहे. त्याने वयाच्या २३ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आता तो ५१ वर्षांचा आहे. २००५ साली त्याने अर्चनासोबत लग्न केले आणि ते सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. 

Web Title: Have you seen Gabbar's son from 'Sholay'? He is also an actor but left Bollywood after 8 films.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.