महिमा चौधरीच्या लेकीला पाहिलंय का? तिच्यासारखीच दिसते गोड; Video मध्ये दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:00 IST2025-01-20T18:00:06+5:302025-01-20T18:00:31+5:30

महिमाचा नवरा कोण होता? कधी झाला घटस्फोट वाचा

Have you seen Mahima Chaudhry s daughter looks beautiful just like mother | महिमा चौधरीच्या लेकीला पाहिलंय का? तिच्यासारखीच दिसते गोड; Video मध्ये दिसली झलक

महिमा चौधरीच्या लेकीला पाहिलंय का? तिच्यासारखीच दिसते गोड; Video मध्ये दिसली झलक

'परदेस' फेम अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) एकेकाळी बॉलिवूडमध्ये आघाडीवर होती. शाहरुखसोबतच्या तिचा 'परदेस' सुपरहिट ठरला होता. महिमाच्या सौंदर्यावर तेव्हा सगळे फिदा होते. तिची गोड स्माईल आजही अनेकांना घायाळ करते. मात्र काही काळानंतर महिमाचे सिनेमे  फारसे चालले नाहीत आणि ती हळूहळू स्क्रीनपासून लांब झाली. नुकतंच तिला कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमात पाहिलं गेलं. पण तुम्ही महिमाच्या लेकीला पाहिलंय का? आईसारखीच ती देखील खूप क्युट दिसते.

महिमा चौधरीच्या लेकीचं नाव आर्यना चौधरी आहे. ती अगदी महिमावरच गेली आहे.  छोटे घारे डोळे, चेहऱ्यावर तीच निरागसता पाहून तिच्यात महिमाच दिसते. काही महिन्यांपूर्वी मायलेकी व्हॅकेशनवर गेल्या होत्या. सुट्टी एन्जॉय करतानाचा त्यांचा महिमाने शेअर केला आहे. तिने लिहिले, "व्हॅकेशन सोबत एक ट्विस्ट. फ्लाईट्सपासून लांब राहिले? नाही. बरेच टेक ऑफ आणि लँडिंग पाहिले. किती सुंदर नजारा आहे." महिमाच्या व्हिडिओमध्ये तिने हॉटेल रुममधून रनवेचा नजारा दिसत असल्याचं दाखवलं आहे. तसंच तिने यामध्ये तिच्यासोबत लेक आर्यना आहे जी खूप गोड दिसत आहे. 


काही दिवसांपूर्वी आर्यना महिमासोबत एका इव्हेंटमध्ये दिसली होती. यावेळी तिला आर्यनाही फिल्म इंडस्ट्रीत येणार का असं विचारण्यात आलं. यावर आर्यना म्हणाली, 'हो मलाही सिनेमात येण्याची इच्छा आहे.' आर्यना तिच्या साधेपणाने आणि नॅचरल लूकने सर्वांचं मन जिंकून घेत आहे. आता तीही आईप्रमाणेच या इंडस्ट्रीत येणार का हे पाहणं महत्वाचं आहे.

महिमा चौधरीने बॉबी मुखर्जीसोबत २००६ साली लग्न केलं होतं. २००७ साली महिमाने लेकीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर ६ वर्षांनी महिमा आणि बॉबीचा घटस्फोट झाला.

Web Title: Have you seen Mahima Chaudhry s daughter looks beautiful just like mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.