तुम्ही पाहिलेयं का ऐश्वर्या रायचे आत्तापर्यंतचे सगळ्यात हॉट फोटोशूट?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2016 05:36 PM2016-12-16T17:36:00+5:302016-12-16T17:36:00+5:30
actress aishwarya rai bachchan angel look photos on instagram : actress aishwarya rai bachchan photoshoot : ऐश्वर्या राय बच्चनने पुन्हा एकदा हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये ऐश्वर्या कमालीची सुंदर दिसतेय. नामवंत फोटोग्राफर प्रसाद नाईक याने ऐश्वर्याचे हे फोटोशूट केलेयं. याचे काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ज तसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन सौंदर्यासोबतच तिच्या दमदार अभिनयासाठीदेखील ओळखली जाते. अलीकडे ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्याचा जलवा दिसला. या चित्रपटातील रणबीर कपूरसोबतच्या तिच्या बोल्ड दृश्यासोबतच तिच्या सौंदर्याचीही चर्चा झाली. यादरम्यानचे रणबीरसोबतचे तिचे हॉट फोटोशूटही गाजले.
पण आता ऐश्वर्याने पुन्हा एकदा हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये ऐश्वर्या कमालीची सुंदर दिसतेय. नामवंत फोटोग्राफर प्रसाद नाईक याने ऐश्वर्याचे हे फोटोशूट केलेयं. याचे काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यापैकी एका फोटोत ऐश्वर्यानेकेसांवर फुलांचा कियारा माळलेला आहे तर दुस-या फोटोत ती एका पांढºया शुभ्र ड्रेसमध्ये दिसतेय. या मॉडर्न उमराव जानचे सौंदर्य जराही कमी झालेले नाही, हेच ऐश्वर्याचे हे फोटो पाहिल्यानंतर वाटते. ४३ वर्षांची ऐश्वर्या पाच वर्षांच्या एका मुलीची आई आहे. मात्र तिचे हे फोटो पाहिल्यानंतर हे सांगूनही पटणार नाही.
अलीकडे एका मुलाखतीत ऐश्वर्याने तिच्या सौंदर्याचे राज सांगितले होते. बेसन, क्रिम आणि हळदीचा फेस पॅक, दही आणि मधाचा मसाज, केळ्याचा फेस मास्क तसेच दूध आणि बदाम तेल हे माझ्या सौंदर्याचे रहस्य असल्याचे ऐश्वर्या म्हणाली होती. ऐश्वर्यासारखे सुंदर दिसायचे असेल तर या गोष्टी वापरून पाहायला हरकत नाही. काय??
प्रेग्नंसीनंतर ऐश्वर्याने बॉलिवूडमधून बराच मोठा ब्रेक घेतला होता. मात्र गतवर्षी संजय गुप्तांच्या ‘जज्बा’ या चित्रपटातून ऐशने दमदार पुनरागमन केले. पाठोपाठ ‘सरबजीत’ या चित्रपटात ती दिसली. यानंतरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’मधून तर ऐश्वर्याने रंगवलेली सबा सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवून गेली.