​राणी मुखर्जीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 05:55 AM2017-11-01T05:55:04+5:302017-11-01T11:25:04+5:30

राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी यांचे २२ ऑक्टोबरला निधन झाले. त्यांची शोकसभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला ...

Have you seen the photograph of Rani Mukherjee's daughter? | ​राणी मुखर्जीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का?

​राणी मुखर्जीच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का?

googlenewsNext
णी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी यांचे २२ ऑक्टोबरला निधन झाले. त्यांची शोकसभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला बॉलिवूड मधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. राणी मुखर्जी तिची मुलगी आदिराला घेऊन तिथे आली होती. आदिराला नेहमीच राणी मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर ठेवते. पण यावेळी पहिल्यांदाचा आदिरा मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली. 
राम मुखर्जी आणि काजोलचे वडील शोमू मुखर्जी हे चुलत भाऊ आहेत. त्यामुळे काजोल आणि राणी या देखील एकमेकींच्या बहिणी आहेत. त्या दोघी गेली अनेक वर्षं एकाच इंडस्ट्रीत काम करत आहेत. एवढेच नव्हे तर कुछ कुछ होता है या चित्रपटात त्या दोघींनी एकत्र काम केले होते. पण त्या दोघींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अबोला आहे. काहीच महिन्यांपूर्वी करण जोहरने त्यांचे पॅचअप करून दिले होते. राम मुखर्जी यांच्या शोकसभेला काजोलने देखील आवर्जून उपस्थिती लावली होती. राम मुखर्जी यांच्या शोकसभेला फराह खान, अनिल कपूर, सोनम कपूर, आशुतोष गोवारिकर, अली अब्बास जफर हजर होते. 

rani mukerji daughter

राम मुखर्जी हे बॉलिवूडमधले मोठे नाव होते. एक नामवंत दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती. त्यांना कलेचा वारसा कुटुंबातूनच मिळाला होता. चित्रपट निर्माते शशाधर मुखर्जी हे राम मुखर्जी यांचे काका होते. हिंदी आणि बंगालीतील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. मुंबईतील ‘फिल्मालय’ स्टुडिओतील संस्थापक सदस्यांपैकी राम मुखर्जी एक होते. राणी मुखर्जीचा पहिला चित्रपट ‘बाइर फुल’याची निर्मिती आणि दिग्दर्शन राम मुखर्जी यांचेच होते. हा बंगली चित्रपट १९९६मध्ये आला होता. यानंतर १९९७ मध्ये राणीने ‘राजा की आएगी बारात’मधून बॉलिवूड डेब्यू केला. हा चित्रपटही राम मुखर्जी यांनी प्रोड्यूस केलेला होता. १९६४मध्ये आलेला दिलीप कुमार आणि वैजयंती माला यांचा ‘लीडर’ आणि १९६० मध्ये आलेला ‘हम हिंदुस्तानी’ या चित्रपटाचेही दिग्दर्शन राम मुखर्जी यांनी केले होते. राणी मुखर्जी हिची आई कृष्णा मुखर्जी पार्श्वगायिका आहे तर राणीचा भाऊ राजा मुखर्जी हा सुद्धा प्रोड्यूसर डायरेक्टर आहे. ‘एक बार मुस्करा दो’,‘लीडर’,‘रक्ते लेखा’(बंगाली),‘तोमार रक्ते अमार सोहाग’(बंगाली),‘रक्त नदीर धारा’(बंगाली) हे राम मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे आहेत.

Also Read : विमानतळाबाहेर ‘बबली’ राणी मुखर्जीचा दिसला असा अंदाज, पहा फोटो!

Web Title: Have you seen the photograph of Rani Mukherjee's daughter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.