"तो प्रत्येक दिवशी...", आमिर खानबद्दल असं काय बोलली नवीन गर्लफ्रेंड गौरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 13:10 IST2025-03-14T13:10:12+5:302025-03-14T13:10:39+5:30
Aamir Khan : आमिर खानने त्याच्या ६०व्या वाढदिवसापूर्वी त्याची नवीन जोडीदार गौरी स्प्रॅटची ओळख करून दिली. दोघेही दीड वर्षापासून डेट करत आहेत. सुपरस्टारच्या गर्लफ्रेंडनेही त्याच्याबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला.

"तो प्रत्येक दिवशी...", आमिर खानबद्दल असं काय बोलली नवीन गर्लफ्रेंड गौरी?
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) १४ मार्च रोजी ६० वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या अगदी आधी, सुपरस्टारने त्याची नवीन जोडीदार गौरी स्प्रेटशी ओळख करून देऊन चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्याने आपल्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितले. त्याने गौरीला डेट करत असल्याची कबुली दिली, जी बंगळुरूची आहे.
मीडियाशी संवाद साधताना आमिर आणि गौरीने काही प्रश्नांची उत्तरे दिली. जेव्हा गौरी स्प्रॅटला विचारण्यात आले की आमिर खानने तिच्यासाठी सर्वात रोमँटिक गोष्ट काय केली आहे, तेव्हा तिने कबूल केले की सुपरस्टार खूप रोमँटिक आहे आणि दररोज काहीतरी रोमँटिक करत असतो. आमिर खानने सांगितले की, दोघेही एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखत असले तरी ते गेल्या दीड वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. गौरीने पुढे सांगितले की, आमिरने तिची त्याच्या कुटुंबाशीही ओळख करून दिली आहे. सर्वांनी त्यांचे खूप छान स्वागत केले.
आमिर खानला आहेत तीन मुलं
आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत झाले होते. तो पुन्हा किरण रावच्या संपर्कात आला. या सुपरस्टारला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा जुनैद खान चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्याला त्याची दुसरी पत्नी किरण राव पासून एक मुलगा आहे, त्याचे नाव आझाद राव आहे. त्यांचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला. दोघांनी २००५ मध्ये लग्न केले आणि २०२१ मध्ये घटस्फोट घेतला. हे दोघेही आपला मुलगा आझादला एकत्र वाढवत आहेत.
'महाभारता'वर बनवायचा चित्रपट
पत्रकार परिषदेत आमिर खानने त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दलही सांगितले. अभिनेत्याने सांगितले की, त्याला 'महाभारत' चित्रपट बनवण्यात खूप रस आहे. अभिनेता म्हणाला, 'आम्ही चित्रपटावर लेखन सुरू केले आहे. यासाठी आम्ही एक टीम आहे. बघूया कसे होते ते.' अभिनेता 'सितारे जमीन पर' या चित्रपटात दिसणार आहे जो २००७ मध्ये आलेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे. हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.