'लग्नासाठी मुली पाहायला जातो, तेव्हा...', रितेश देशमुखचं 'ते' विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 12:34 PM2023-03-17T12:34:19+5:302023-03-17T12:36:18+5:30
Riteish Deshmukh : रितेश देशमुखचा सोशल मीडियावरील लेटेस्ट व्हिडीओ चर्चेत आला आहे.
बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक कपल म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया डिसूझा-देशमुख (Genelia Dsouza-Deshmukh). या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. हे दोघे नुकतेच वेड चित्रपट पाहायला मिळाले. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियावरील व्हिडीओमधूनही त्यांच्यातील प्रेम दिसून येते. नुकतेच रितेशने एक रिल शेअर केला आहे. ज्यात तो स्त्रियांबद्दल वक्तव्य करताना दिसत आहे.
रितेश आणि जिनिलिया देशमुख सोशल मीडियावर सक्रिय असतात. बऱ्याचदा ते एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हि़डीओ शेअर करत असतात. नुकतेच रितेशने एक रिल शेअर केला आहे. ज्यात त्याने लग्नानंतर बायकोच्या आवाजात होणाऱ्या बदलाबद्दल सांगितले आहे.
रितेश म्हणतो की, मित्रांनो, जेव्हा आपण लग्नासाठी मुलगी पाहायला जातो, तेव्हा तिचा आवाज हा रेडिओपेक्षाही कमी असतो. परंतु मला कळत नाही लग्न झाल्यावर त्यात बुफर कसे लागतात. हे सर्व ऐकून जिनिलियाने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
रितेशचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याला समदु:खी असल्याचे सांगितले आहे. अनेकांनी कमेंट करत त्याला तो योग्य बोलतोय, असे सांगितले आहे. रितेश भावा, मी तुझ्याबरोबर आहे. मला देखील हा त्रास आहे, असे एकाने युजरने म्हटले आहे. तर दुसऱ्याने एकदम बरोबर म्हटलं, अशी कमेंट केली आहे.