​काळवीट हत्या प्रकरणी आज सुनावणी, सलमान खान पोहोचला जोधपूरला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2017 10:28 AM2017-01-18T10:28:31+5:302017-01-18T10:28:31+5:30

हम साथ साथ है या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये सुरू असताना सलमान खान तसेच या चित्रपटातील त्याचे सहकलाकार सैफ अली ...

Hearing the case of Kalbudd killing case, Salman Khan reached Jodhpur in the case | ​काळवीट हत्या प्रकरणी आज सुनावणी, सलमान खान पोहोचला जोधपूरला

​काळवीट हत्या प्रकरणी आज सुनावणी, सलमान खान पोहोचला जोधपूरला

googlenewsNext
साथ साथ है या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये सुरू असताना सलमान खान तसेच या चित्रपटातील त्याचे सहकलाकार सैफ अली खान, नीलम, सोनाली बेंद्रे, तब्बू यांनी काळवीटाची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सलमानने परवाना संपलेली शस्त्र बाळगल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला असून याच शस्त्राने त्याने काळवीटांची शिकार केली असादेखील आरोप याचिकाकर्त्यांनी त्याच्यावर केला आहे. अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानविरोधात जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज अंतिम सुनावणी होणार आहे. सलमान यात दोषी आढळल्यास त्याला तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. 
या अंतिम सुनावणीसाठी सलमानला कोर्टात उपस्थित राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे काल रात्रीच सलमान जोधपूरला पोहोचला आहे. त्याची बहीण अलविरा अग्निहोत्रीदेखील त्याच्यासोबतच आहे. सलमान कालपासून जोधपूरमधील हरी महल पॅलेस या हॉटेलमध्ये राहात आहे. 
सलमानच्या केसची अंतिम सुनावणी आज दुपारी 11च्या दरम्यान होईल असे म्हटले जात आहे. 1998सालच्या या केसमध्ये सलमानच्याविरोधात चार केस आहेत. त्याने तीन वेगवेगळ्या ठिकाणी हरणांची शिकार केला असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यातील दोन केसमध्ये उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि आणखी एका केसची सुनावणी 25 जानेवारीला जोधपूर कोर्टात होणार आहे. 
सलमानला आजच्या सुनावणीत तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा न्यायालयाने सुनावल्यास त्याची लगेचच कारागृहात रवानगी करण्यात येईल. पण त्याला तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाल्यास त्याला वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी आणि जामीन अर्ज दाखल करण्याठी वेळ देण्यात येईल.

Web Title: Hearing the case of Kalbudd killing case, Salman Khan reached Jodhpur in the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.