एका बापाची मन हेलावणारी कहाणी! नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाचा हृदयस्पर्शी टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 01:09 PM2024-10-29T13:09:35+5:302024-10-29T13:10:09+5:30

नाना पाटेकरांच्या आगामी 'वनवास' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. बातमीवर क्लिक करुन बघा (vanvas, nana patekar)

Heart touching teaser of Nana Patekar's Vanvas movie directed by gadar 2 fame anil sharma | एका बापाची मन हेलावणारी कहाणी! नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाचा हृदयस्पर्शी टीझर रिलीज

एका बापाची मन हेलावणारी कहाणी! नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाचा हृदयस्पर्शी टीझर रिलीज

नाना पाटेकर यांच्या आगामी 'वनवास' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. नाना पाटेकर यांचा अनेक महिन्यांनी यानिमित्ताने बॉलिवूडमध्ये एखादा सिनेमा येणार आहे. 'वनवास'  सिनेमाचा पोस्टरपासूनच सिनेमाविषयी मनोरंजन विश्वात चर्चा होती. आता या सिनेमाचा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज झालाय. 'अपने ही देते है अपनो को वनवास' अशा टॅगलाईनखाली असणाऱ्या 'वनवास' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. 

'वनवास'च्या टीझरमध्ये काय?

'वनवास' सिनेमाच्या टीझरमध्ये सुरुवातीला बनारसचा घाट आणि नंतर हिमालयाचा बर्फाच्छादित प्रदेश दिसतो. तिथे नाना पाटेकर त्यांच्या मुलाच्या नावाने हाका मारत असलेल्या पाहायला मिळतात. ते बनारसच्या गल्लीबोळात त्यांच्या मुलाला शोधत असतात. शेवटी नाना पाटेकर यांच्या फोटोला हार पाहायला मिळतो आणि त्यांच्यासाठी शोकसभा भरवली जाते. जीवंत असूनही लोक नाना पाटेकरांनी जगाचा निरोप घेतला असं समजतात.


कधी रिलीज होणार 'वनवास'?

'वनवास'च्या टीझरमध्ये शेवटी नाना पाटेकर यांचा एक भावनिक संवाद बघायला मिळतो. तू एवढासा असतानाच तुला मी कचराकुंडीत टाकून दिलं असतं तर? असा सवाल ते करताना दिसतात. अशाप्रकारे 'वनवास'चा टीझर इमोशन्सने भरलेला आहे. 'गदर' आणि 'गदर २' या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक अनिल शर्मांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. २० डिसेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. नाना पाटेकरांचा 'वनवास' बघायला सर्वांना उत्सुकता असेल यात शंका नाही.

Web Title: Heart touching teaser of Nana Patekar's Vanvas movie directed by gadar 2 fame anil sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.