‘हॅलो... कॅप्टन बोल रहा हूं’ असे म्हणताच बॉलिवूडकरांना फुटायचा घाम; वाचा अबू सालेमचे बॉलिवूड कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 09:08 AM2017-09-07T09:08:30+5:302017-09-07T14:45:17+5:30

१२ मार्च १९९३ ला मुंबईला रक्तरंजित करणाºया कुख्यात गँगस्टर अबू सालेमला विशेष टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सालेमला ...

'Hello ... I am speaking', says Bollywood folks; Read Abu Salem's Bollywood connection! | ‘हॅलो... कॅप्टन बोल रहा हूं’ असे म्हणताच बॉलिवूडकरांना फुटायचा घाम; वाचा अबू सालेमचे बॉलिवूड कनेक्शन!

‘हॅलो... कॅप्टन बोल रहा हूं’ असे म्हणताच बॉलिवूडकरांना फुटायचा घाम; वाचा अबू सालेमचे बॉलिवूड कनेक्शन!

googlenewsNext
मार्च १९९३ ला मुंबईला रक्तरंजित करणाºया कुख्यात गँगस्टर अबू सालेमला विशेष टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सालेमला मुंबईमध्ये बॉम्बब्लास्टचा कट रचल्याच्या आरोपात दोषी ठरविण्यात आले होते. मुंबईच्या माफिया वर्ल्डमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनंतर अबू सालेमची हुकूमत चालायची. बॉलिवूडमध्ये तर त्याची दहशत कित्येक वर्षे राहिली आहे. वास्तविक सालेमचे बॉलिवूड कनेक्शन खूपच घनिष्ठ राहिले आहे. त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...

अबू सालेमने दाऊद इब्राहिमच्या मदतीने मुंबईच्या गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले. त्याकाळी सालेम ऐवढा क्रूर होता की, त्याच्या कामावर स्वत: दाऊद खूश झाला होता. पुढे त्याने सालेमवर बॉलिवूड आणि बांधकाम व्यावसायिकांकडून वसुलीची जबाबदारी सोपविली. सालेमनेही भाईने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्यास सुरुवात केली. त्याच्या रडारवर बॉलिवूड कलाकार, दिग्दर्शक, निर्माता यांच्यासह बांधकाम व्यावसायिक असायचे. त्यांच्याकडून तो भक्कळ पैसाही वसूल करायचा. धमकाविणे, गोळीबार करणे तसेच एखाद्याचा मर्डर करणे हे अबू सालेमच्या ‘बाहे हात का खेल’ असायचे. त्यामुळे अबू सालेमची इंडस्ट्रीत ऐवढी दहशत वाढली होती की, त्याला छोट्या-मोठ्या अभिनेत्यांसह निर्मातेही ‘कॅप्टन’ नावाने ओळखू लागले.



संगीत सम्राट गुलशन कुमारची हत्या
सालेमने १९९७ मध्ये संगीत सम्राट गुलशन कुमार यांची हत्या केली होती. सालेमने गुलशन कुमार यांना धमकावित प्रत्येक महिन्याला पाच लाख रूपये खंडणी देण्याची मागणी केली होती. यावर गुलशन कुमारने म्हटले होते की, ‘तुला ऐवढे पैसे दिल्यापेक्षा त्या पैशांनी मी वैष्णो देवीच्या नावाने भंडारा करेल.’ गुलशन कुमार यांच्या या वक्तव्यानंतर सालेम असा काही भडकला की, त्याने शूटर राजाच्या माध्यमातून गुलशन कुमार यांची दिवसाढवळ्या हत्या केली. असे म्हटले जाते की, शूटर राजाने गुलशन कुमारच्या हत्येदरम्यान त्याचा फोन जवळपास १० ते १५ मिनिटं सुरू ठेवला होता. जेणेकरून गुलशन कुमार यांचा आक्रोश सालेमला ऐकता यावा. या हत्याकांडात संगीतकार नदीम याचाही समावेश असल्याची चर्चा आहे. 



हॅलो मैं, कॅप्टन बोल रहा हूं...
गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर अबू सालेमची बॉलिवूडमध्ये जबरदस्त दहशत निर्माण झाली होती. त्याचे नाव जरी घेतली तरी बॉलिवूड कलाकारांच्या अंगावर शहारे यायचे. तो जेव्हा-जेव्हा एखाद्यास फोन करायचा तेव्हा-तेव्हा ‘‘मैं कॅप्टन बोल रहा हूं’ या शब्दाचा वापर करायचा. कॅप्टन नाव ऐकताच कलाकाराच्या काळजात धडकी भरायची. वास्तविक मुंबई पोलिसांकडून त्याचे फोन टॅप केले जात असल्याने त्याने हे कोड नाव निवडले होते. या व्यतिरिक्त सालेमला बॉलिवूडमध्ये ‘आर्सलान’ या नावानेही ओळखले जात होते. याच नावाचा वापर करून त्याने अभिनेत्री मनीषा कोईराला हिच्या सचिवाची हत्या केल्याचे समजते. 



अबू सालेम आणि संजय दत्तचा याराना
१९९२ या वर्षाच्या अखेरीस देशात धार्मिकतेवरून सर्वत्र दंगे पेटले होते. सुनील दत्त यांच्या परिवाराने या जातीय दंग्यांमध्ये जखमी झालेल्या लोकांच्या धर्माची चिंता न करता त्यांना मदत केली. मात्र जेव्हा एका समुदायाने सुनील दत्त यांच्या कारवर हल्ला केला तेव्हा त्यांचा परिवार अस्वस्थ झाला. यावेळी अभिनेता संजय दत्तने हनीफ कडावाला आणि समीर हिंगोला नावाच्या निर्मात्यांकडून मदत मागितली होती. या निर्मात्यांनी अनिस इब्राहिम याच्याशी याप्रकरणी संपर्क साधला. त्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की, अबू सालेम कडावाला आणि हिंगोला यांच्यासोबत संजय दत्तच्या घरी बंदूक आणि हातगोळे घेऊन जाणार. सालेम संजूबाबाला त्याचा रोल मॉडेल समजायचा. यानिमित्त त्याला संजूबाबाची भेट घेण्याची संधीच साधून आली होती. जेव्हा तो संजूबाबाला भेटला होता, तेव्हा त्याच्या कपाळावर घाम फुटला होता. त्याने घाम पुसत संजूबाबाला सेकहॅण्ड केले. पुढे संजूबाबाने त्याला झप्पी दिली. त्यानंतर त्यांच्यात याराना झाला. 



मोनिका बेदी-अबू सालेम लव्हस्टोरी
पंजाबमध्ये जन्मलेल्या मोनिका बेदी हिने ब्रिटनमधील आॅक्सफोर्ड युनिर्व्हसिटीमधून इंग्रजी साहित्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने मुंबई येथे येऊन डान्सचे प्रशिक्षण घेतले. पुढे तिने बॉलिवूडमध्ये येण्याचे ठरविले. तिला लगेचच मुकेश दुग्गल यांचा ‘सुरक्षा’ हा चित्रपटही मिळाला. मात्र दुग्गल आणि सालेम यांच्यात सुरुवातीपासूनच मैत्री होती. पुढे दुबईच्या एका पार्टीत अबू सालेम आणि मोनिका बेदीची भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेम प्रकरण बहरले. हे प्रकरण अनेक देशांमधील कारागृहात शिक्षा भोगून आल्यानंतर ४ जुलै २००७ मध्ये संपले. कारण या तारखेला मोनिकाला लिस्बनमध्ये सालेमसोबत अटक झाल्यानंतर तब्बल पाच वर्षाने भारतात आणले. पुढे तिची सुटकाही झाली. सध्या मोनिका छोट्या पडद्यावर करिअर करीत आहे. 

Web Title: 'Hello ... I am speaking', says Bollywood folks; Read Abu Salem's Bollywood connection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.