हेमा मालिनी आणि परवीन बॉबीच्या किसिंग सीनमुळे उडाली होती खळबळ, सिनेमा ठरला होता फ्लॉप, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 06:24 PM2024-09-30T18:24:18+5:302024-09-30T18:25:04+5:30

Raziya Sultan Movie : १९८३ साली प्रदर्शित झालेला 'रझिया सुलतान' हा चित्रपट समलैंगिक प्रेमकथेवर बनवण्यात आला होता, मात्र हेमा मालिनी आणि परवीन बाबी सारख्या स्टार्सच्या प्रेम प्रकरणाची कथा असूनही तो फ्लॉप ठरला होता.

Hema Malini and Parveen Bobby's kissing scene created excitement, the movie was a flop, but... | हेमा मालिनी आणि परवीन बॉबीच्या किसिंग सीनमुळे उडाली होती खळबळ, सिनेमा ठरला होता फ्लॉप, पण...

हेमा मालिनी आणि परवीन बॉबीच्या किसिंग सीनमुळे उडाली होती खळबळ, सिनेमा ठरला होता फ्लॉप, पण...

१९८३ साली प्रदर्शित झालेला 'रझिया सुलतान' हा चित्रपट समलैंगिक प्रेमकथेवर बनवण्यात आला होता, मात्र हेमा मालिनी आणि परवीन बाबी सारख्या स्टार्सच्या प्रेमप्रकरणाची कथा असूनही तो फ्लॉप ठरला होता. रझिया सुलतान या चित्रपटालाही अनेक वादांना सामोरे जावे लागले होते. १३व्या शतकातील दिल्लीच्या राजवटीवर आधारित या चित्रपटावर निर्मात्यांनी मोठा खर्च केला होता. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांना तीन वर्षे लागली पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. याशिवाय निर्मात्यांनाही प्रचंड वादांना सामोरे जावे लागले होते.

कमाल अमरोही दिग्दर्शित रझिया सुलतानमध्ये हेमा मालिनी, परवीन बॉबी आणि धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १० कोटी रुपये खर्चून बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ २ कोटी रुपये कमवू शकला. या चित्रपटानंतर दिग्दर्शकाने अशा विषयावर पुन्हा चित्रपट बनवणार नाही अशी शपथ घेतली होती.

किसिंग सीन आला होता चर्चेत
रझिया सुलतानया चित्रपटात हेमा मालिनी आणि परवीन बाबी यांच्यातील समलैंगिक रोमान्स दाखवण्यात आला होता. त्यावेळी दोघांमध्ये किसिंग सीनवरून मोठा वाद झाला होता. याशिवाय चित्रपटातील उर्दू संवादांमुळेही प्रेक्षकांची उत्सुकता कमी झाली. कारण असे अनेक सीन्स होते ज्यातील संवाद समजणे प्रेक्षकांना अवघड होते.

Web Title: Hema Malini and Parveen Bobby's kissing scene created excitement, the movie was a flop, but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.