४० वर्षानंतर एकत्र आले सावत्र भावंडं; 'गदर 2' मुळे हेमा मालिनीच्या लेकींनी घेतली सनी देओलची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 11:52 AM2023-08-13T11:52:26+5:302023-08-13T11:53:19+5:30

Esha deol: इशाने 'गदर 2'साठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवलं होतं.

hema-malini-daughter-esha-deol-special-screening-gadar-2-sunny-deol-bobby-esha-step-sisters-seen-together-after-40-years | ४० वर्षानंतर एकत्र आले सावत्र भावंडं; 'गदर 2' मुळे हेमा मालिनीच्या लेकींनी घेतली सनी देओलची भेट

४० वर्षानंतर एकत्र आले सावत्र भावंडं; 'गदर 2' मुळे हेमा मालिनीच्या लेकींनी घेतली सनी देओलची भेट

googlenewsNext

सनी देओल याचा बहुप्रतिक्षीत ठरलेला 'गदर 2' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्यामुळे सध्या या सिनेमाची प्रेक्षकांमझ्ये चर्चा आहे. यामध्येच या सिनेमाच्या निमित्ताने देओल कुटुंबात एक मोठी घडामोड घडली. तब्बल ४० वर्षानंतर हेमा मालिनीच्या लेकी आणि प्रकाशकौर यांची मुलं एकत्र आले. विशेष म्हणजे या सावत्र भावंडांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गदर २ रिलीज झाल्यानंतर ईशा देओल (esha deol) आणि आहाना देओल (Ahana Deol) यांनी सनी ( sunny deol) आणि बॉबी देओल (bobby deol) यांची भेट घेतली. यावेळचा एक व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अपने तो अपने होते हैं असं म्हणत लोकांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

सनी देओलचा गदर २ रिलीज झाल्यानंतर ईशाने तिच्या मित्रांसाठी शनिवारी खास स्क्रीनिंग ठेवलं होतं. यावेळी पहिल्यांदाच ही सगळी भावंड एकत्र दिसली. इतकंच नाही तर ईशाने मीडियाशी बोलताना हा सिनेमा पाहण्याचं आवाहनदेखील केलं आहे. ईशाने ठेवलेलं स्क्रिनिंग पाहण्यासाठी बॉबी देओल त्याच्या पत्नीसह पोहोचला. तर, धर्मेंद्रदेखील (Dharmendra) त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर हिच्यासोबत या स्क्रिनिंगला हजर राहिली. दरम्यान, काही दिवसांनी ३० ऑगस्टला रक्षाबंधन आहे. त्यामुळे या सणापूर्वीच ही चारही सावत्र भावंड एकत्र आल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

Web Title: hema-malini-daughter-esha-deol-special-screening-gadar-2-sunny-deol-bobby-esha-step-sisters-seen-together-after-40-years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.