धर्मेंद - हेमा मालिनी पुन्हा एकदा बनले आजी-आजोबा, आहानाने दिला जुळ्या मुलींना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 10:31 AM2020-11-28T10:31:13+5:302020-11-28T10:31:53+5:30

कटी मुलगी अहाना देओल बोहराने 26 नोव्हेंबरला जुळ्या मुलींना जन्म दिला. अहाना आणि तिचा पती वैभव वोहरा यांनी आपल्या जुळ्या मुलींची नावे अ‍ॅस्ट्रिया आणि आडिया असे ठेवले आहेत.

Hema Malini, Dharmendra become grandparents again as daughter Ahana gives birth to twin girls | धर्मेंद - हेमा मालिनी पुन्हा एकदा बनले आजी-आजोबा, आहानाने दिला जुळ्या मुलींना जन्म

धर्मेंद - हेमा मालिनी पुन्हा एकदा बनले आजी-आजोबा, आहानाने दिला जुळ्या मुलींना जन्म

googlenewsNext

अभिनेते धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी आहाना देओलने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. आहानाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. चिमुकल्यांच्या आगमनानंतर कुटुंबीयांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनानंतर खुद्द हेमा मालिनी यांनी गोड बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली आहे.


त्यांची धाकटी मुलगी अहाना देओल बोहराने 26 नोव्हेंबरला जुळ्या मुलींना जन्म दिला. अहाना आणि तिचा पती वैभव वोहरा यांनी आपल्या जुळ्या मुलींची नावे अ‍ॅस्ट्रिया आणि आडिया असे ठेवले आहेत. अहानाला अद्याप रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला नाही, अशी माहिती मिळाली आहे.


आहानाचे वैभव वोहरासह  2 फेब्रुवारी 2014 रोजी लग्न झाले होते. त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म जून 2015 मध्ये झाला होता. त्याने आपल्या मुलाचे नाव डरेन वोहरा असे ठेवले आहे. अहानाने अभिनेत्री म्हणून कधी काम केलेले नाही. आहानाने 'गुजारिश' चित्रपटात संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. या जोडीने आजवर एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यांनी सुरुवातीला शराफत आणि तुम हसीन मैं जवाँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांची या चित्रपटातील जोडी प्रेक्षकांना भावल्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटांमध्ये काम करत असतानाच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी पुढे जाऊन लग्न केले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यात 13 वर्षांचे अंतर असून धर्मेंद्र यांनी लग्न करण्याच्या आधी इस्लाम धर्म स्वीकारला होता.

हेमा मालिनीसोबत लग्न केल्यानंतरही धर्मेंद्र आपल्यी पहिल्या पत्नीला सोडणार नसल्याचे त्यांनी लग्नाच्या आधीच हेमा मालिनी यांना सांगितले होते. हिंदू धर्मात दोन लग्न करण्याची परवानगी नसल्याने धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारून त्यांचे नाव दिलवार ठेवले आणि हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले.

Web Title: Hema Malini, Dharmendra become grandparents again as daughter Ahana gives birth to twin girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.