अनेक वर्षांपासून हा खास फोटो शोधत होत्या हेमा मालिनी, मिळाल्यावर असा व्यक्त केला आनंद
By रूपाली मुधोळकर | Published: November 8, 2020 02:35 PM2020-11-08T14:35:09+5:302020-11-08T14:38:18+5:30
हा फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला. सोबत एक भलीमोठी पोस्टही...
72 वर्षांच्या हेमा मालिनी यांनी 1968 साली प्रदर्शित ‘सपनों के सौदागर’ या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या सिनेमात त्याचे हिरो होते राज कपूर. या सिनेमात हेमा दुप्पट वयाच्या राज कपूर यांच्यासोबत काम करण्यास तयार झाल्या ख-या. पण हा सिनेमा फार काही कमाल दाखवू शकला नाही. या डेब्यू सिनेमाआधी हेमांनी एका तामिळ मॅगझिनसाठी खास फोटोशूट केले होते. आज या गोष्टीला जवळपास 55 वर्षे झालेत. या फोटोशूटचा फोटो हेमा गेल्या कित्येक वर्षांपासून शोधत होत्या. आपल्या बायोग्राफीत हा फोटो त्यांना प्रकाशित करायचा होता. मात्र अनेक प्रयत्न करूनही त्यांना हा फोटो मिळाला नव्हता. मात्र शनिवारी हा फोटो त्यांना मिळाला आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मग काय, हा फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला. सोबत एक भलीमोठी पोस्टही...
पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ‘मी अनेक वर्षांपासून हा एक फोटो शोधत होते. तामिळ मॅगझिनसाठी मी एक खास फोटोशूट केले होते. मॅगझिनचे नाव मला आठवत नाही. पण एव्हीएम स्टुडिओमध्ये याचे शूटींग झाले होते. राज कपूर यांच्यासोबत ‘सपनों का सौदागर’मधून डेब्यू करण्यापूर्वी. त्यावेळी माझे वय 14 वा 15 वर्षांचे असेल. हा फोटो माझ्या ‘बियॉन्ड द ड्रिमगर्ल’ या बायोग्राफी असावा, अशी माझी इच्छा होती. मात्र दुर्दैवाने त्यावेळी हा फोटो आम्ही मिळवू शकलो नाही. पण अखेर आज हा फोटो मला मिळाला. मी खूप आनंदा आहे आणि आता हा फोटो मी तुमच्यासोबत शेअर करतेय.’
हेमा यांनी आपल्या 4 दशकांच्या करिअरमध्ये 150 पेक्षा अधिक सुपरहिट सिनेमांत काम केले. 1961 साल त्यांनी सर्वप्रथम ‘तांडव वनवासम’मध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती.
फिल्मी आहे हेमा मालिनी व जितेन्द्र यांच्या ‘न झालेल्या’ लग्नाची गोष्ट...
बॉलिवूडच्या समर्थनार्थ 'ड्रीमगर्ल' सरसावली; जया बच्चननंतर हेमा मालिनीनं कंगना राणौतला सुनावलं