आईचा सल्ला न ऐकल्यामुळे मोडला ईशाचा संसार?; आज असती बच्चन कुटुंबाची सून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 11:52 AM2024-02-15T11:52:11+5:302024-02-15T11:53:08+5:30

Esha deol: ईशाने भरतऐवजी अभिषेकसोबत लग्न करावं अशी हेमा मालिनी यांची इच्छा होती.

hema-malini-wanted-to-make-abhishek-bachchan-her-son-in-law-esha-deol-did-such-a-thing-that | आईचा सल्ला न ऐकल्यामुळे मोडला ईशाचा संसार?; आज असती बच्चन कुटुंबाची सून

आईचा सल्ला न ऐकल्यामुळे मोडला ईशाचा संसार?; आज असती बच्चन कुटुंबाची सून

बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल (esha deol) हिच्या आयुष्यात सध्या अनेक चढउतार येत आहेत. जवळपास १२ वर्ष भरत तख्तानीसोबत संसार केल्यानंतर ईशाने त्याच्यापासून काडीमोड घेतला. त्यामुळे सध्या ती सातत्याने चर्चेत येत आहे. ईशाने भरतसोबत लव्हमॅरेज केलं होतं. मात्र, आपल्या लेकीने भरत ऐवजी अभिषेकसोबत लग्न करावं अशी हेमा मालिनी (hema malini) यांची इच्छा होती. परंतु, एक कारण देत इशाने अभिषेकचं स्थळ नाकारलं.

२०१२ मध्ये ईशा आणि भरतने लग्नगाठ बांधली. त्यानंतर जवळपास १२ वर्ष त्यांचा संसार सुखाने सुरु होता. त्यांना दोन लेकीसुद्धा आहेत. मात्र, अचानकपणे या जोडीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते विभक्त झाल्याची माहिती दिली. त्यानंतर या जोडीच्या अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या. यामध्येच ईशाने भरतसोबत लग्न करु नये अशी हेमा मालिनी यांची इच्छा असल्याचं म्हटलं जात आहे.

हेमा मालिनीला करायचं होतं अभिषेकला जावई 

ईशा आणि अभिषेक (abhishek bachchan) यांचं लग्न व्हावं अशी हेमा मालिनी यांची प्रचंड इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्याशी बोलणं सुद्धा केलं होतं, असं म्हटलं जातं. मात्र, ईशाला हे नातं मान्य नव्हतं. अभिषेकला आपण मोठ्या भावाप्रमाणे मानतो, असं कारण देत तिने या लग्नाला नकार दिला होता. त्यानंतर तिने घरी भरतविषयी सांगितलं आणि त्यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली.

दरम्यान, ईशा आणि अभिषेक या जोडीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. यात 'दस', 'धूम', 'LOC-कारगिल', 'युवा' या सिनेमांचा समावेश आहे.
 

Web Title: hema-malini-wanted-to-make-abhishek-bachchan-her-son-in-law-esha-deol-did-such-a-thing-that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.