Hera Pheri 3: कन्फर्म!! ‘हेरा फेरी 3’मध्ये ‘मुन्नाभाई’ची एन्ट्री, साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 04:23 PM2023-03-06T16:23:26+5:302023-03-06T16:25:25+5:30

Hera Pheri 3: होय, चित्रपटात मुन्नाभाईची एन्ट्री झालीये. होय, हेरा फेरा 3 मध्ये आता संजय दत्तही दिसणार आहे.

Hera Pheri 3: Sanjay Dutt To Join Akshay Kumar | Hera Pheri 3: कन्फर्म!! ‘हेरा फेरी 3’मध्ये ‘मुन्नाभाई’ची एन्ट्री, साकारणार ही भूमिका

Hera Pheri 3: कन्फर्म!! ‘हेरा फेरी 3’मध्ये ‘मुन्नाभाई’ची एन्ट्री, साकारणार ही भूमिका

googlenewsNext

हेरा फेरा 3 (Hera Pheri 3) या चित्रपटामध्ये बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) दिसणार असल्यानं आधीच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. आता या चित्रपटाची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी आणखी एक गुडन्यूज आहे. होय, चित्रपटात मुन्नाभाईची एन्ट्री झालीये. होय, हेरा फेरा 3 मध्ये आता संजय दत्तही दिसणार आहे.

संजय दत्त कोणती भूमिका साकारणार, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असालच. तर तो विलन रवी किशनच्या मोठ्या भावाची भूमिका साकारताना दिसणार आहे. संजय दत्तने स्वत: ही माहिती दिली. हेरा फेरा 3 मध्ये काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो, असं तो म्हणाला. ही एक मजेशीर फ्रेंचाइजी आहे. निर्माता फिरोज नाडियाडवाला व माझी जुनी मैत्री आहे, मी खूप आनंदी आहे, असंही तो म्हणाला.

रिपोर्टनुसार हेरा फेरी 3 ची स्टोरी ही दुसऱ्या भाग जिथे संपला होता, तिथून सुरू होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील माफियांची स्टोरी या भागामध्ये बघायला मिळणार आहे. चर्चा खरी मानाल तर नीरजच्या या स्टोरीमध्ये सध्याच्या परिस्थितीनुसार काही ट्विस्ट टाकले गेले आहेत. शिवाय चित्रपटात एका नव्या पात्राचा प्रवेश होणार आहे. हे नवं पात्र अर्थातच संजय दत्तचं आहे. यात संजूबाबा एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.
संजय दत्त हा या चित्रपटात रवी किशनच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. बाबाची एन्ट्री होताच, हेरा फेराच्या प्रेमात असलेल्या चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे.   

Web Title: Hera Pheri 3: Sanjay Dutt To Join Akshay Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.