आदित्य रॉय कपूरला मिळाली सत्यजीत पाध्येची साथ, सिनेमात दिसणार वेगळ्याच अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 01:18 PM2020-11-24T13:18:17+5:302020-11-24T13:24:31+5:30

आदित्यची ‘ऑल्टर इगो’  दाखवण्यात  आलेली त्याच्यासारखी हुबेहुब दिसणारी बाहुली सुप्रसिध्द शब्दभ्रमकार रामदास पाध्ये आणि त्यांचा मुलगा सत्यजीत पाध्ये ह्यांनी बनवली आहे.

Here's how Aditya Roy Kapur's alter ego puppet was made using 3D technology in Anurag Basu's Ludo | आदित्य रॉय कपूरला मिळाली सत्यजीत पाध्येची साथ, सिनेमात दिसणार वेगळ्याच अंदाजात

आदित्य रॉय कपूरला मिळाली सत्यजीत पाध्येची साथ, सिनेमात दिसणार वेगळ्याच अंदाजात

googlenewsNext

फिल्ममेकर अनुराग बासुच्या नुकत्याच ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झालेल्या ‘लूडो’ ह्या चित्रपटाची सध्या तुफान चर्चा होत आहे.  ह्या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूरला शब्दभ्रम आणि बोलक्या बाहुल्यांची कला अवगत असते. ह्या सिनेमात आदित्यची ‘ऑल्टर इगो’  दाखवण्यात  आलेली त्याच्यासारखी हुबेहुब दिसणारी बाहुली सुप्रसिध्द शब्दभ्रमकार रामदास पाध्ये आणि त्यांचा मुलगा सत्यजीत पाध्ये ह्यांनी बनवली आहे. 3डी प्रींटिंग प्रणालीचा उपयोग करून त्यांनी आदित्यसाराखी दिसणारी बाहुली बनवलीय.

 

आदित्य रॉय कपूर  आपली स्वत:ची अशा पध्दतीच '3डी' बाहुली असलेला पहिला अभिनेता बनला आहे. ह्याविषयी अधिक माहिती देताना  रामदास पाध्ये  यांनी सागंतिले की,  “अनुराग बासु यांना आम्ही हुबेहुब दिसणा-या बाहुल्या बनवू शकतो,ह्याविषयी माहिती होती. ते  आम्हाला भेटले, आम्ही काही संग्रही असलेल्या बाहुल्या दाखवल्या. तेव्हा त्यातले बारकावे पाहून त्यांना आश्चर्यच वाटले होते.”

रामदास पाध्येंच्या संग्रहात 2200 पेक्षा जास्त बाहुल्या आहेत. वडिलांप्रमाणेच ह्या क्षेत्रात नाव कमावलेले सत्यजित पाध्ये तर इंडियाज गॉट टैंलेंट, ‘केबीसी’, ‘बिग बॉस’ अशा लोकप्रिय शो मध्येही दिसला आहे. सत्यजीतने सांगितले की,  "आदित्यची 3डी बाहुली बनवताना आम्ही त्याचा 3 डी स्कॅन केरून घेतला. त्यानंतर आदित्यचे काही 3 डी फोटो काढले. आणि मग त्यानूसार, आम्ही फायनल 3डी प्रीटेंड बाहुली तयार केली. आदित्यच्या ह्या बाहुलीचं वैशिष्ठ्य ठेवायचं होतं, त्याची हेयरस्टाइल आणि त्याच्या चेह-यावरचं लांबसडक नाक. “

ही बाहुली बनवल्यावर पुढे होता सर्वात कठीण भाग. तोंडाची ठेवण, भुवया, आणि पापण्या ह्यांची हालचाल करायची होती. मग इथे रामदास पाध्ये ह्यांचा अनुभव कामी आला. ह्यानंतर आदित्यला सत्यजीतने ट्रेनिंग दिले. ट्रेनिंगच्या अनुभवाविषयी सत्यजित सांगतो,  “आदित्यच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता. तो मन लावून ही कला आत्मसात करण्यामध्ये लक्ष द्यायचा. मी त्याच्या घरी त्याला शिकवायला जायचो.  तंत्रशुध्द शिक्षण आदित्यने खूप लवकर शिकले. शुटिंगच्या दरम्यान मदतीसाठी मी उपस्थित होतो. पण मला सांगायला आनंद वाटतो, की, आदित्यने अनेक बारकाव्यांसह ही भूमिका चांगली वठवलीय. 

 

आदित्य रॉय कपूरने सत्यजीतला फिल्मनंतर मेसेज करत त्याचे आभारही मानले आहेत. आदित्यने म्हटलंय, “ह्या चित्रपटातल्या माझ्या भुमिकेच्या तयारीसाठी आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्याकडून ही सुंदर कला शिकणे हा एक अद्भुत अनुभव होता. आपल्या वडिलांना (रामदास पाध्ये) ह्यांनाही माझा परफॉर्मन्स आवडेल अशी आशा आहे.”

Web Title: Here's how Aditya Roy Kapur's alter ego puppet was made using 3D technology in Anurag Basu's Ludo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.