आता कशी दिसते सलमान खानची ही गर्लफ्रेन्ड? सध्या कुठे आहे, काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 04:20 PM2020-04-26T16:20:06+5:302020-04-26T16:20:31+5:30

 सलमान व सोमीच्या रिलेशनशिपचे किस्से एकेकाळी प्रचंड गाजले होते.

Here's how Salman Khan's girlfriend somy ali looks now-ram | आता कशी दिसते सलमान खानची ही गर्लफ्रेन्ड? सध्या कुठे आहे, काय करते?

आता कशी दिसते सलमान खानची ही गर्लफ्रेन्ड? सध्या कुठे आहे, काय करते?

googlenewsNext
ठळक मुद्दे२००६ मध्ये तिने महिलांच्या अधिकारांसाठी काम करायला सुरुवात केली आणि नो मोअर टीअर्स नावाची संस्था स्थापन केली.

सलमान खानच्या चाहत्यांसाठी सोमी अली हे नाव नवे नाही. सलमान व सोमीच्या रिलेशनशिपचे किस्से एकेकाळी प्रचंड गाजले होते. पाकिस्तानात जन्मलेली सोमी पालकांसोबत फ्लोरिडाला शिफ्ट झाली आणि पुढे तिला बॉलिवूड अभिनेत्री होण्याची स्वप्ने पडू लागलीत. हिरोईन होण्याच्या स्वप्नाने तिला असे काही पछाडले होते की, हे स्वप्न तिला स्वस्थ बसू देईना. यातच तिने सलमानचा ‘मैने प्यार किया’ हा सिनेमा बघितला आणि सोमी जणू सलमानची झाली. होय, हा सिनेमा बघितल्यावर सलमानशीच लग्न करायचे हे तिने ठरवून टाकले होते. मग काय,  सलमानचा पिच्छा करत करतच ती फ्लोरिडावरून मुंबईत आली, असे म्हटले तरी ते खोटे नाही. यावेळी सोमी केवळ १६ वर्षांची होती. आज ही सोमी कुठे आहे, काय करते, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तर सलमानसाठी सोमी मुंबईत आली. मुंबईत आल्या आल्या मॉडेल झाली आणि नंतर हिरोईनही. सलमानही तिला भेटला. भेटलाच नाही तर तो तिचा बॉयफ्रेन्ड बनला. तो तिचा पहिला बॉयफ्रेन्ड होता. सलमान व सोमीची लव्हस्टोरी एक दोन वर्षे नाही तर 8 वर्षे चालली. पण अचानक सलमानच्या आयुष्यात ऐश्वर्या रायची एन्ट्री झाली आणि तिच्यामुळे सलमान व सोमीचे ब्रेकअप झाले.

ज्या सलमानसोबत लग्न करण्याच्या इराद्याने सोमी मुंबईत आली होती, आता तेच स्वप्न भंगले होते. म्हणायला सोमी हिरोईन होती. तोपर्यंत दहा चित्रपटांत ती झळकली होती. पण सलमान नाही तर काहीच नाही, जणू अशी तिची अवस्था झाली होती. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमीने बॉलिवूड सोडले आणि ती फ्लोरिडाला रवाना झाली. यानंतर ती कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही.


 
 फ्लोरिडाला परतल्यानंतर  येथे तिने सायकॉलॉजीचे शिक्षण घेतले. यानंतर मियामी युनिव्हर्सिटीतून जर्नालिझम केले. यादरम्यान डॉक्युमेंट्री बनवण्यात तिला रस वाटू लागला. पुढे तिने न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकेडमीत प्रवेश घेतला. त्यानंतर सोमीने महिलांच्या आयुष्यावर काही लघुपट बनवले.

२००६ मध्ये तिने महिलांच्या अधिकारांसाठी काम करायला सुरुवात केली आणि नो मोअर टीअर्स नावाची संस्था स्थापन केली. पाचव्या वर्षी सोमीवर लैंगिक अत्याचार झाला होता. हेच ही संस्था सुरू करण्यामागचे खरे कारण होते. आता सोमी जगभरातील महिलांच्या अधिकारांसाठी काम करते. सोमीच्या या संस्थेचे हजारो सदस्य आहेत. सोमी कदाचित आजही सलमानवर तेवढेच प्रेम करते. म्हणूनच आजपर्यंत ती अविवाहित आहे.

Web Title: Here's how Salman Khan's girlfriend somy ali looks now-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.