Singham Again मधील हिरो बदलला? रोहित शेट्टीच्या पोस्टने इंटरनेटवर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 12:09 PM2024-09-04T12:09:07+5:302024-09-04T12:09:57+5:30

Singham Again : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या 'खतरों के खिलाडी' सीझन १४ होस्ट करत आहे. दरम्यान, रोहित त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटामुळे देखील चर्चेत आहे.

Hero Changed in Singham Again? Rohit Shetty's post created excitement on the internet | Singham Again मधील हिरो बदलला? रोहित शेट्टीच्या पोस्टने इंटरनेटवर खळबळ

Singham Again मधील हिरो बदलला? रोहित शेट्टीच्या पोस्टने इंटरनेटवर खळबळ

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) सध्या 'खतरों के खिलाडी' सीझन १४ होस्ट करत आहे. दरम्यान, रोहित त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' (Singham Again) या चित्रपटामुळे देखील चर्चेत आहे. हा या वर्षाचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे ज्यात सुपरस्टार अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अजय देवगणचे यंदाचे 'मैदान' आणि 'औरों में कहां दम था' या चित्रपटांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. अशा परिस्थितीत आता अजयच्या चाहत्यांना 'सिंघम अगेन'कडून खूप अपेक्षा आहेत. हा एक बिग बजेट चित्रपट आहे ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता रोहित शेट्टीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. रोहितने आपल्या मजेशीर कॅप्शनने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.


रोहित म्हणाला- 'सिंघम' या हिरोशिवाय आहे अपूर्ण 
रोहित शेट्टीने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ 'सिंघम अगेन'च्या सेटववरचा दिसत आहे. यामध्ये रोहित दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसत आहे. यानंतर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारची दमदार एंट्री होताना दिसते आहे. व्हिडिओमध्ये स्कॉर्पिओची फक्त झलक पाहायला मिळते. व्हिडिओ शेअर करत रोहितने कॅप्शन दिले की, 'सिंघम' या हिरोशिवाय अपूर्ण आहे. या दिवाळीत स्कॉर्पियो येणार आणि फिरणारसुद्धा . पण दुसऱ्या कोणाची तरी एंट्री होईल. रोहितच्या या कॅप्शनमुळे चित्रपटाचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.

चाहत्यांची वाढली उत्सुकता
सिंघम अगेनवरील रोहित शेट्टीच्या या नवीन अपडेटबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. रोहितच्या व्हिडिओवर नेटिझन्सनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, 'ब्लॉकबस्टर लोड होत आहे. पुन्हा सिंघमची वाट पाहू शकत नाही. एका यूजरने लिहिले की, 'याची आतुरतेने वाट पाहत आहे.' रोहित शेट्टी ज्या हिरोबद्दल बोलत आहे तो अक्षय कुमार असू शकतो असाही अनेक चाहत्यांना विश्वास आहे.

सिंघम अगेनमध्ये झळकणार हे कलाकार
अजय देवगण व्यतिरिक्त दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि टायगर श्रॉफ देखील या चित्रपटाचा भाग आहेत. त्याचा खलनायक अर्जुन कपूर आहे. २०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Hero Changed in Singham Again? Rohit Shetty's post created excitement on the internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.