या नायकांना हव्यात या वयाच्या नायिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:06 AM2016-01-16T01:06:14+5:302016-02-11T23:52:35+5:30
'दिलवाले'चा शाहरुख 50 वर्षांचा आहे तर काजोल 41 वर्षांची आहे. त्यामुळे त्यांची जोडी छान जमली. बॉलिवूडमधील 'बेस्ट जोडी' अशी ...
' ;दिलवाले'चा शाहरुख 50 वर्षांचा आहे तर काजोल 41 वर्षांची आहे. त्यामुळे त्यांची जोडी छान जमली. बॉलिवूडमधील 'बेस्ट जोडी' अशी उपमा शाहरूख-काजोल साठी वापरली जाते. मात्र शाहरुख खानसोबत त्याच्या समवयस्क नायिके चा विचार केला तर त्याने दीपा साही हिच्यासोबत काम केले होते. दीपा साही शाहरुखच्या वयाची म्हणजे 50 वर्षांची आहे.
या वर्षी सनी देओल व कंगणा रानौतचा 'आय लव्ह एनवाय' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या सनी देओलचे वय 58 वर्षे तर कंगणा केवळ 28 वर्षांची आहे. दोघांत 30 वर्षांचे अंतर आहे. तरी ती सनीची नायिका झाली आहे. दिलवालेचा निकष या चित्रपटाला लावला तर सनीची नायिका नितू सिंग असावयास हवी. नितू सिंग 57 वर्षांची आहे. 70 व 80 च्या दशकात नितू सिंग आघाडीची नायिका होती.
बॉलिवूडच्या भाईजानने मागील चित्रपटात सोनम कपूर व करिना कपूर हिच्यासोबत पडद्यावर रोमांस केला आहे. सोनम 30 वर्षांची तर करिना 35 वर्षांची आहे. यापूर्वी सलमानची नायिका 28 वर्षांची सोनाक्षी सिन्हा झाली होती. 1980 च्या दशकात सिनेमात प्रारंभ करणार्या सलमानसाठी यावेळी सुटेबल नायिका म्हणून पद्मिनी कोल्हापुरे किंवा किमी काटकरचे नाव घ्यावे लागेल. दोघींचे वय यावेळी 50 वर्षे आहे.
अजय देवगन याने दृष्यम'मध्ये श्रीया सरन हिच्यासोबत काम केले. श्रीया 33 वर्षांची आहे. अजयसोबत सुटेबल ऐजची नायिका शिल्पा शिरोडकर असेल ती देखील अजयप्रमाणे 46 वर्षांची आहे. अक्षय कुमारच्या 'सिंग इज ब्लिंग' या चित्रपटात अँमी जॅकसन सोबत काम केले आहे. अक्षय यावेळी 48 वर्षांचा आहे तर अँमी केवळ 23 वर्षांची आहे. अक्षयची सुटेबल नायिका माधुरी दीक्षित असेल दोघांचे वय सारखेच आहे.
सैफ अली खानने 'फँटम' या चित्रपटात 32 वर्षीय कॅटरिना कैफ सोबत काम केले. त्याच्या वयाच्या नायिकेचा शोध घेतल्यावर मनिषा कोईरालाचे नाव समोर येते. दोघांचेही वय समान म्हणजेच 45 वर्षे आहे. यापूर्वी सैफने कमी वयाच्या नायिकांसोबत काम केले आहे.
अभिनेत्रींचे नवृत्तीचे वय 35 समजले जाते. काही नायिका एका वयानंतर वेगळय़ा भूमिकांत दिसू लागतात. त्यांना सहाय्यकांच्या भूमिका मिळू लागतात, मात्र अभिनेत्यांचे तसे नाही. नायक म्हणून काम करण्याची त्यांना मोठी संधी असते. अमिताभ बच्चन यांनी रविना टंडन व मनिषा कोइराला यांच्यासोबत पडद्यावर रोमांस केला आहे. केवळ बॉलिवूडमध्येचे हे होते असे नाही. तर दाक्षिणात्य सिनेमांत देखील अशीच मालिका आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनी देखील निम्म्या वयाच्या नायिकांशी पडद्यावर रोमांस केला आहे. विश्वास वाटत नसेल तर रजनीकांतचा 'लिंगा' पाहून बघा.
(सौजन्य : याहू)