या हिरोंची ‘खलनायकी’ पडली ‘नायक’ अवतारावर भारी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 08:56 AM2018-01-26T08:56:45+5:302018-01-26T17:44:18+5:30
‘पद्मावत’मध्ये रणवीर सिंगने साकारलेल्या अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेचे वारेमाप कौतुक होत आहे. निश्चितपणे ‘पद्मावत’ हा रणवीरच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. ...
‘ द्मावत’मध्ये रणवीर सिंगने साकारलेल्या अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेचे वारेमाप कौतुक होत आहे. निश्चितपणे ‘पद्मावत’ हा रणवीरच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीर पहिल्यांदा निगेटीव्ह रोलमध्ये दिसतोय. खरे तर ही भूमिका रणवीरसाठी मोठी रिस्क होती. एका सीनिअरमोस्ट अभिनेत्याने रणवीरला हा चित्रपट न करण्याचा सल्ला दिला होता. खुद्द रणवीरने याबाबत खुलासा केला होता. अनेकांनी मला हा चित्रपट न करण्याचा सल्ला दिला होता. एका सीनिअर अभिनेत्यानेही मला हा चित्रपट तुझ्या करिअरसाठी धोकादायक ठरू शकतो, असेच सांगितले होते. अनेकदा लोकांना पडद्यावरील निगेटीव्ह भूमिका आवडत नाही. मग ही भूमिका जगणा-या कलाकाराचाही लोक द्वेष करू लागतात. मुख्य प्रवाहातील कुठल्याही कलाकाराच्या करिअरसाठी असा द्वेष धोकादायकचं म्हणता येईल. ‘पद्मावत’तील अलाऊद्दीन खिल्जीची निगेटीव्ह भूमिका साईन करण्याआधी मलाही हा धोका जाणवला होता. याचमुळे हा चित्रपट साईन करण्यासाठी मी बराच वेळ घेतला. माझ्यासाठी हा कठीण निर्णय होता. पण मला संजय लीला भन्साळींवर पूर्ण विश्वास होता आणि आहे. त्यांना मी कधीच नाही म्हणू शकत नाही. म्हणूनच मी ही रिस्क घेतली, असे रणवीरने म्हटले होते. पण शेवटी हीच रिस्क रणवीरसाठी एक मोठी संधी ठरली, असे म्हणायला हरकत नाही.
रणवीरआधीही अनेक हिरोंनी हिरो साकारता साकारता विलेन साकारला आणि त्यांचा हा विलेन अवतार प्रचंड हिट ठरला. काही चित्रपटात तर या अभिनेत्यांचा ‘खलनायकी’ अवतार त्यांच्या ‘नायक’ अवतारावर भारी पडला.
राणा दग्गुबती
राणा दग्गुबती याने ‘बाहुबली2’मध्ये साकारलेली भल्लालदेवाची निगेटीव्ह भूमिका याच पठडीतील आहे. प्रभासला राणाने जोरदार टक्कर दिली. इतकी की बाहुबलीसमोर भल्लाल देव कुठेच कमी पडला नाही.
अक्षय कुमार
अक्षय कुमारने हिरो असताना निगेटीव्ह रोल साकारले आहेत. ‘अजनबी’ या चित्रपटात अक्षयने विलेन साकारला होता. या चित्रपटात बॉबी देओल नायकाच्या भूमिकेत होता. यातील अक्षयचा निगेटीव्ह रोल बॉबीच्या भूमिकेवर भारी पडला होता. लवकरच अक्षय कुमार ‘2.0’ या चित्रपटात खलनायक साकारताना दिसणार आहे.
संजय दत्त
‘अग्निपथ’च्या रिमेकमध्ये संजय दत्तने कांचा चीनाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात संजयचा लूक प्रचंड घाबरवणारा होता. खरे तर ‘खलनायक’ चित्रपटाही संजय निगेटीव्ह रोलमध्ये दिसला होता. पण संजूबाबाने रंगवलेल्या कांचा चीनाच्या पात्राला तोड नाही.
सैफ अली खान
‘ओंकारा’ या चित्रपटात सैफ अली खान निगेटीव्ह रोलमध्ये दिसला होता. बहुतांश चित्रपटात शिकलेल्या, हॅण्डसम हिरोची भूमिका साकारणाºया सैफला गँगस्टर रोलमध्ये पाहणे एक अफलातून अनुभव होता.
आमिर खान
दीपा मेहता दिग्दर्शित ‘1947अर्थ’ चित्रपटात आमिर खान विलेन म्हणून दिसला होता. कथेसोबत बदलणारा त्याचा हिरो ते विलेन प्रवास प्रचंड शॉकिंग होते.
शाहरूख खान
शाहरूख खानही त्याच्या करिअरच्या सुवर्णकाळात निगेटीव्ह भूमिका साकारताना दिसला होता. ‘बाजीगर’, ‘डर’,‘अंजाम’ यासारख्या चित्रपटात शाहरूख निगेटीव्ह रोलमध्ये दिसला होता.