- आणि राणी मुखर्जीच्या ‘हाय हिल्स’ पाहून भडकले कमल हासन ...वाचा इंटरेस्टिंग किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 01:44 PM2020-02-21T13:44:48+5:302020-02-21T13:46:34+5:30
राणीने शेअर केलेत ‘हे राम’च्या सेटवरचे किस्से
कमल हासन, शाहरूख खान, राणी मुखर्जी यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘हे राम’ या चित्रपटास नुकतेच 20 वर्षे पूर्ण झालेत. याच पार्श्वभूमीवर एका ताज्या मुलाखतीत राणीने या चित्रपटाच्या सेटवरचे अनेक अनुभव शेअर केलेत.
शूटींगआधी अनेकदा धुतला चेहरा
राणीने सांगितले, ‘कमल हासन यांच्यासोबत काम करण्याची संधी मला कुठल्याही स्थितीत गमवायची नव्हती. पहिल्या दिवशी मी सेटवर गेले. तो दिवस मला आजही आठवतो. कमलजींनी माझ्याकडे पाहिले आणि जा, चेहरा धुवून ये, असे मला सांगितले. मी चेहरा धुतला. पण अॅक्टर या नात्याने चेहºयावरचे पूर्ण मेकअप निघणार नाही,याची मी काळजी घेतली. मी चेहरा धुतल्यानंतर परत आले. कमल यांनी माझ्याकडे निरखून पाहिले आणि जा, पुन्हा चेहरा धुवून ये, असे ते मला म्हणाले. मी चेहºयावरचे मेकअप पूर्णपणे उतरवून त्यांच्यासमोर आले. मी बाहेर येताच त्यांनी माझ्या माथ्यावर बिंदी लावली आणि मेकअप आर्टिस्टला थोडे काजल लावायला सांगितले. यानंतर मला पाहून, माझी अपर्णा तयार आहे, असे ते मला म्हणाले. तो माझा पहिला अनुभव होता. अॅक्टिंगसाठी प्रत्येकवेळी मेकअपची गरज नसते, हे मी त्या अनुभवातून शिकले.’
पडला होता ओरडा
मला आजही आठवते, तेव्हा मी सतत हिल घालायचे. कारण माझी उंची कमी होती. त्यादिवशी कमलजींनी माझ्या पायांकडे बघितले. माझ्या पायात प्लॅटफॉर्म हिल्सची स्लीपर होती. ती पाहून, वाह, वाह... हे काय? असा प्रश्न त्यांनी मला केला. यावर मी हसले आणि या हिल्समध्ये मी अगदी कम्फर्टेबल आहे. मी ठेंगणी आहे, म्हणून मी सतत हिल्स घालते, असे मी त्यांना म्हणाले. यावर ते अक्षरश: माझ्यावर चिडलेत. वेडी आहेस का? प्लेन स्लीपर घाल. तुझी उंची ही तुझी उपलब्धी नाही. तू जे काही आहेस,ती तुझी उपलब्धी आणि ओळख आहे, असे काहीसे रागारागात ते मला म्हणाले. त्या दिवसानंतर मी माझ्या उंचीचा कधीच बाऊ केला नाही. एक उत्तम कलाकार असण्यासाठी उंची गरजेची नाही, हे मी त्यादिवशी शिकले.
‘हे राम’ हा सिनेमा मूळ तामिळ भाषेत बनवला गेला होता. तो हिंदीतही रिलीज झाला होता.