'हे बेबी' मधली गोंडस चिमुकली आठवतेय का? आता झालीय मोठी! फोटोंची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 14:38 IST2024-04-29T14:36:51+5:302024-04-29T14:38:16+5:30
'हे बेबी' मधली १७ महिन्यांची चिमुकली आता झालीय मोठी. फोटो पाहून ओळखूच येणार नाही (akshay kumar, juanna sanghvi, vidya balan)

'हे बेबी' मधली गोंडस चिमुकली आठवतेय का? आता झालीय मोठी! फोटोंची चर्चा
बॉलिवूडमधला सर्वांचा लाडका सिनेमा म्हणजे 'हे बेबी'. या सिनेमाची कथा, गाणी, सिनेमातील शाहरुख खानचा कॅमिओ चांगलाच गाजला. या सिनेमात एका लहान मुलीला सांभाळताना आणि तिचे आई - बाबा शोधताना तीन तरुणांची कशी तारांबळ उडते, याची गमतीशीर कथा 'हे बेबी' मधून पाहायला मिळते. या सिनेमात दिसलेली लहान मुलगी आता मोठी झाली असून तुम्ही तिला ओळखूच शकणार नाही.
कोण आहे ती 'बेबी'?
'हे बेबी' सिनेमातील बेबी एन्जलचे खरे नाव जुआना संघवी आहे. जेव्हा ती सिनेमात दिसली तेव्हा ती फक्त १७ महिन्यांची होती. पण आता जुआना खूप मोठी झाली आहे. तुम्ही तिला ओळखू शकणार नाही इतकी ती सुंदर दिसतेय . जुआना संघवीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत दिसत आहे. ही फोटो पाहिल्यानंतर हे बेबी मधली हीच ती लहान मुलगी आहे का, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण हे खरं आहे.
सध्या काय करते जुआना?
सध्या जुआना संघवी तिच्या अभ्यासात व्यस्त आहे. 'हे बेबी' नंतर ती पुन्हा कोणत्याही सिनेमात दिसली नाही. ती सध्या पूर्णपणे अभ्यासावर तिचं लक्ष केंद्रीत करत आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर सुद्धा जुआना सक्रीय नाही. 'हे बेबी' नंतर जुआना भविष्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार की नाही हे येणारा काळच सांगेल. 'हे बेबी' सिनेमात अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या मुलीच्या गोंडस मुलीची भूमिका जुआनाने साकारली होती.