Hijab Contraversy: हर्षाला न्याय द्या, हत्येनंतर रविना टंडन अन् चित्रपट निर्माता मुंद्रा आले पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 09:56 AM2022-02-22T09:56:12+5:302022-02-22T09:59:52+5:30

कर्नाटकच्या शिवमोगा येथे रविवारी रात्री 9 वाजता ही हत्येची घटना घडली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

Hijab Contraversy: Give justice to Harsha, after the murder Raveena Tandon and director Mundra came forward | Hijab Contraversy: हर्षाला न्याय द्या, हत्येनंतर रविना टंडन अन् चित्रपट निर्माता मुंद्रा आले पुढे

Hijab Contraversy: हर्षाला न्याय द्या, हत्येनंतर रविना टंडन अन् चित्रपट निर्माता मुंद्रा आले पुढे

googlenewsNext

मुंबई - कर्नाटकातील हिजाब वाद न्यायालयाच्या निर्णयानंतरही मिटला नसल्याचे दिसून येत आहे. या वादामुळे कर्नाटकातील काही जिल्ह्यांत तणावाचे वातावरण असून आता शिवमोगा येथील घटनेनं खळबळ उडाली आहे. शिवमोगा येथे बंजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणात हिजाब वादाशी संबंध आहे का, याचा तपास पोलीस यंत्रणांकडून करण्यात येत आहे. मात्र, या घटनेचे देशभर पडसाद उमटताना दिसून येत आहेत. ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. अभिनेत्री रविना टंडनही या घटनेवर ट्विट केलं आहे. 

कर्नाटकच्या शिवमोगा येथे रविवारी रात्री 9 वाजता ही हत्येची घटना घडली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. शिवमोगा येथे हत्या करण्यात आलेल्या 26 वर्षीय युवकाचे नाव हर्षा असून तो बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याचं उघडकीस आलं आहे. हर्षाने आपल्या फेसबुकवर हिजाबविरुद्ध पोस्टी केली होती, त्याने भगवा शालीचं समर्थन केलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हत्याप्रकरणानंतर शिवमोगा येथे तणावाचे वातावरण पसरले असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. 


अभिनेत्री रविना टंडन आणि चित्रपट निर्माते मनीष मुंद्रा यांनी या घटनेबद्दल ट्विट करुन न्यायाची मागणी केली आहे. ट्विटरवर हॅशटॅग 'जस्टीस फॉर हर्षा' हा ट्रेंड होत असून मुंद्रा यांनी ही मॉब लिचिंग असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त न्यूटन आणि मसान या चित्रपटांसाठी मुंद्रां यांची ओळख आहे. तर, रविनाने कवेळ #JusticeForHarsha असे टाईप करत न्यायाची मागणी केली आहे.  

गृहमंत्र्यांनी घेतली भेट, शाळा-कॉलेज बंद

घटनेनंतर वाढता तणाव पाहता कल 144 लागू करण्यात आले आहे. तसेच, शाळा आणि महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी पीडित कुटुंबीयांशी भेटून संवाद साधला. ज्ञानेंद्र यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटले की, हत्या करण्यात आलेल्या युवकांस 4 ते 5 जणांनी ठार मारल्याचा संशय आहे. पोलिसांचा तपास सुरू असून संबंधित आरोपी हे कुठल्या संघटनेशी संलग्नित आहेत का, याचाही तपास घेण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शिवमोगा जिल्ह्यात दोन दिवस शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं. 

दरम्यान, कर्नाटकातील हिजाब वादावर बंजरंग दल सर्वाधिक सक्रीय आहे. अनेक हिंदू संघटनाही शाळा-महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यास विरोध करत आहेत. हिजाब विरोधी प्रदर्शन करताना भगवी शाल गळ्यात घालून ते विरोध दर्शवताना दिसून येतात. 
 

Web Title: Hijab Contraversy: Give justice to Harsha, after the murder Raveena Tandon and director Mundra came forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.